‘महिलेसोबत नको त्या अवस्थेत…’, गिरीश महाजनांवर टीका करताना एकनाथ खडसे काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jalgaon political news : ncp leader eknath khadse slams bjp Leader girish mahajan
Jalgaon political news : ncp leader eknath khadse slams bjp Leader girish mahajan
social share
google news

Eknath Khadse vs Girish Mahajan : खान्देशातील राजकारण एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन नावांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. एकेकाळी एकाच पक्षात राहिलेल्या या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सध्या प्रचंड वाढला आहे. कधी स्थानिक निवडणुका, तर कधी इतर मुद्द्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसतात. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांना जुन्या गोष्टींची आठवण करून देत डिवचलं आहे.

शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावर जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक दिवसीय धरणे आंदोलन गुरूवारी (25 मे) करण्यात आले. या आंदोलनाला एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर टीका करताना जुन्या गोष्टींचा उल्लेख केला. माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, “काही वर्षांपूर्वी फर्दापूरच्या विश्रामगृहात एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलं होतं? माझी चूक झाली. मी त्यावेळेस त्यांना सोडलं. मी तिथं पोहचलो म्हणून वाचले. पोलिसांत अटक करवून दिली असती तर आज फायद्यात राहिला असतो”, असं एकनाथ खडसे हे गिरीश महाजनांवर टीका करताना म्हणाले.

हेही वाचा >> Maharashtra Politics : बच्चू कडूंचं जे झालं, तेच आता रवी राणांचंही होणार?

“मी कुणाला पकडलं नाही. चार भिंतीच्या आत कुणाशी तासंतास गप्पा मारत नाही. रेल्वे प्रवासात एसी फर्स्ट क्लासच्या बोगीत कुणाला सोबत घेऊन प्रवास करत नाही”, असंही एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘तू माझ्या मागे ED लावली म्हणून तुझ्या मागे मकोका लावला’

यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी खळबळजनक दावाही केला. “गिरीश महाजन यांनी माझ्यामागे सर्व यंत्रणा लावली. ईडी चौकशी लावली. सीबीआय चौकशी सुरु केली अन् उलट मला विचारतो की माझ्यामागे मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) का लावला? तू माझ्यामागे ईडी लावली म्हणून तुझ्या मागे मी मकोका लावला”, असे विधान एकनाथ खडसे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा >> New Parliament building : नेहरू ते मोदी अन् राजदंड; इतिहास काय, इतकं महत्त्व का?

“राज्यातील राजकारणात सरकारच्या विरुद्ध जो बोलतो त्याच्या विरोधात ईडी लावली जाते. त्याच्याविरोधात सीबीआय व इतर सरकारी यंत्रणांचा वापर करून दबाव आणला जातो”, असा आरोपही खडसेंनी यावेळी केला. मंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख करत गिरीशने तर माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या असल्याचे खडसे म्हणाले. “सरकारमध्ये असताना एवढा माज येणं बरोबर नाही. सत्तेचा माज हा फार काळ टिकत नाही”, असा इशारा खडसेंनी महाजनांना दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT