Raver : पवार काका-पुतण्यानंतर सून विरुद्ध सासरा; एकनाथ खडसे उतरणार मैदानात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raver lok sabha constituency election 2024 : eknath khadse will campaign against raksha khadse.
Raver lok sabha constituency election 2024 : eknath khadse will campaign against raksha khadse.
social share
google news

Raver Lok Sabha Constituency : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध अजित पवार हे काका-पुतणे राजकीय मैदानात समोरासमोर आलेले असताना आता खान्देशातही एका कुटुंबात अशीच स्थिती उद्भवताना दिसतेय. राज्यात सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून, आता महाराष्ट्रात सून विरुद्ध सासरा असं दृश्य प्रचारात बघायला मिळणार आहे. हे कुटुंब दुसरं तिसरं कुणाचं नसून, ते आहे एकनाथ खडसे यांचं. आगामी काळात रावेर मतदारसंघात नेमकं काय घडणार आहे, याबद्दल खडसेंनी सूचक विधान केलंय.

ADVERTISEMENT

2024 च्या लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेससह शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांनी पक्षाच्या बांधणीवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना युबीटी) विरुद्ध महायुती (भाजप, शिवसेना, अजित पवार गट) अशीच लढत बघायला मिळणार आहे.

वाचा >> ’70 कोटींचं काय झालं’, उद्धव ठाकरे तापले! ‘कलंक’वरून मोदींवरही चढवला हल्ला

प्रत्येक मतदारसंघांचा आढावा सध्या घेतला जात असून, रावेर लोकसभा मतदारसंघात वेगळं दृश्य यावेळी बघायला मिळणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार, हे निश्चित नसले तरी याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडे असणार आहे.

हे वाचलं का?

एकनाथ खडसे रावेर लोकसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?

“महाविकास आघाडी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. चर्चेमध्ये ज्या पक्षाकडे ही जागा येईल, त्या पक्षाचे जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.

सुनेच्या पराभवासाठी सासरा करणार प्रचार

2019 मधील राजकीय परिस्थितीशी तुलना केल्यास राज्यातील सध्याची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2019 मध्ये भाजप छोट्या पक्षासह विरोधी बाकांवर होती. पण, आता भाजप शिवसेनेला आणि अजित पवार गटाला सोबत घेऊन सत्तेत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली आहे.

ADVERTISEMENT

रावेर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं, तर 2019 मध्ये खडसे कुटुंबात फूट पडलेली नव्हती. 2019 नंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत आल्यापासून खडसे देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत.

ADVERTISEMENT

वाचा >> Chhagan Bhujbal : “सुप्रियांचं नाव येताच प्रफुल पटेल म्हणाले मी राजीनामा देतो”

सध्या एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या रावेरच्या खासदार आहेत. त्यांनी भाजपाच्या तिकिटावर जिंकून आलेल्या आहेत. ज्यावेळी त्या जिंकून आल्या, त्यावेळी खडसे भाजपमध्ये होते. परंतु, एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत गेल्याने महाविकास आघाडीची रावेर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आता खडसेंकडे असणार आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा आम्ही लढवू असं खडसेंनी म्हटलंय…. त्यामुळे खडसे आपल्या सुनेच्या विरोधात कोणत्या मुद्द्यावरून प्रचार करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT