एकनाथ शिंदेंचा ‘तो’ किस्सा आदित्य ठाकरेंनी सांगितला जसाचा तसा..

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाकडून सातत्याने वेगवेगळे आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. अशातच आता आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) CM शिंदेंनी बंड का केलं आणि कशा पद्धतीने केलं याबाबतचा नेमका किस्साच जसाच्या तसा सांगितला आहे. मुंबई Tak बैठक (Mumbai Tak Baithak) या खास कार्यक्रमात त्यांनी बोलताना नेमकं काय-काय घडलं ते सांगितलं. पाहा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले. (eknath shinde came to varsha bungalow and cried aditya thackeray told the exact story)

ADVERTISEMENT

‘शिंदे ‘वर्षा’वर येऊन रडले होते…’

‘मला आठवतंय की, 20 मेची तारीख होती.. साधारणपणे नोव्हेंबरमध्ये मी जेव्हा ग्लासगोला होतो तेव्हा उद्धव साहेबांची सर्जरी ठरली होती. ती सर्जरी झाल्यानंतर दुसरी सर्जरी तात्काळ करावी लागली होती. त्यानंतर पुढचा जो दीड ते दोन महिन्यांचा काळ होता उद्धव साहेब कोणाला भेटू शकत नव्हते. मी पण त्यांना भेटताना कमीतकमी 5 कोव्हिड टेस्ट करून 2-3 तासानंतर मला आत जायला मिळायचं.’

‘अर्थात मी जी ही गँग आहे त्यांना भेटायचो.. पण बाहेर येऊन कार्यक्रम करुन येत असताना उद्धव साहेबांना भेटत असताना.. उद्धव साहेबांनी प्रत्येक आठवड्यात जी काही महत्त्वाची कामं होती ती ते व्हीसीवरुन करायचे.’

हे वाचलं का?

अधिक वाचा- आजही मी बाळासाहेबांच्या आठवणीने भावूक होतो : नारायण राणे

‘त्यावेळी या 40 जणांचे जे गँग लीडर आहेत त्यांना वाटलं की, उद्धव साहेब परत उभे राहू शकणार नाही. किंवा पक्ष पुन्हा उभा राहू शकणार नाही. मग दिवाळीत आमदारांना जे काही द्यायचं होतं ते दिलं. हे सगळं कानावर येत होतं. हे कानावर येत असताना तरीही आम्हाला विश्वास बसत नव्हता.’

‘दोन-तीन आमदार आम्हाला सांगत होते.. यांच्या बरोबर जे आमदार गेले आहेत त्यातील दोन-चार आमदार गेले आहेत ते अक्षरश: 10-15 मे रोजी घरी पण येऊन त्यांनी सांगितलं की, हे सतत त्यांच्या फार्म हाऊसला का जातात. खरंच तिथे जातात का? मोबाइल का बंद असतो.. दिल्ली तर जात नाही ना.. अहमदाबादला तर जात नाही ना.. ते तुम्ही लक्ष का नाही ठेवत. आम्हाला पैसे का देतात?’

ADVERTISEMENT

‘हे सगळं झालं.. तरीही आमचं होतं की, ते मंत्री आहेत. त्यांना तुम्हाला फंड द्यावा लागतो. तुम्ही सगळे काम करत असतात.. त्यातून ते आमदार गेलेच त्यांच्या बरोबर..’

ADVERTISEMENT

‘पण या आमदारांवर विश्वास ठेवायचा की, ज्या व्यक्तीला आपण सगळं दिलंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न होता. मला वाटतं दावोस असताना 20 मे रोजी त्यांना उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावलं होतं. त्यावेळी त्यांना विचारलं की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का?’

‘हे सगळं जे काही चाललं आहे.. या ज्या काही घडामोडी आहेत पक्ष काही परत उभा राहणार नाही.. उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहणार नाही.. हे का कानावर येतंय? काय नक्की तुमचा प्रॉब्लेम आहे.’

अधिक वाचा- ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित

‘मग जे घडलं ते घडलंच शेवटी.. ते समोर रडलेच की, आता असंय मला जेलमध्ये जाण्याचं हे वय नाही… असं तसं.. मला वाटतं संजय राऊतांना पण त्यांनी अयोध्येला तेच सांगितलं होतं. मग ते पळाल्यानंतर त्यांचं गुडलक किंवा.. भाजपला दाखवायचं होतं की, नाही.. नाही हीच सेना आणि म्हणून मुख्यमंत्री झाले.’

‘मूळ गोष्ट हीच आहे की, सगळं काही नीट असताना तुम्हाला जावं लागलं.. त्याआधी त्यांच्या आजूबाजूचे जे लोकं होतं ते दोन-तीन महिने गायब होते. ते कुठे होते? अटकेत होते की पळून गेले होते? आता ते सगळे कार्यरत आहेत मंत्रालय चालवत आहेत. खरं तर ते भीतीपायीच गेले.’

अधिक वाचा- मुंबई Tak बैठक: शिंदे की फडणवीस.. 2024 ला कोण असणार मुख्यमंत्री?, एकनाथ शिंदे म्हणतात…

‘एका मंत्र्याने तर अन्नाची शपथ घेतली होती. तरीही ते निघून गेले. त्यांची नावं जगजाहीर आहेत. पण मी कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही. अंगावर आलं तर शिंगावर घेणार.. पण स्वत:हून कधी जायचं नाही अंगावर..’

‘आता एवढी वर्ष सोबत राहिल्यानंतर हेच सांगत होतो की, घाबरायचं काय कारण आहे. सगळा देश एका वेगळ्या परिस्थितीतून चालला आहे. आपण कदाचित विचार करू की, आपल्या देशात लोकशाही आहे की, आपण सगळे अॅक्टिंग करतोय की, आपण लोकशाहीत राहतोय.’

‘तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं की, मी तुमचाच आहे.. मी कुठे जाणार.. पण मी नुसता सांगून आलोय. कारण सांगावं लागतं. असं तसं..’ असा सगळा घटनाक्रमच यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितला.

आता आदित्य ठाकरेंच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT