Eknath Shinde : ''...म्हणून फडणवीसांच्या अटकेचा डाव रचला होता'', शिंदेंचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट
Eknath Shinde Interview : एकनाथ शिंदे यांची एएनआयने मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत परमबीर सिंग यांच्या आरोपावर खळबळजनक माहिती दिली आहे. ''मला अटक करण्याचा डाव होता. याचच मला दु:ख आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना अटक करण्याचा त्यांचा विचार होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदे यांची एएनआयने मुलाखत घेतली आहे
मला अटक करण्याचा डाव होता
फडणवीस आणि इतर नेत्यांना अटकेचा त्यांचा विचार होता
Eknath Shinde Interview : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अडकवण्याचा महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचा डाव होता, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. या आरोपांवर आता मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीसांना अटक करण्याचा डाव का रचण्यात आला होता? या मागचं खळबळजनक कारण आता शिंदेंनी सांगितलं आहे. (eknath shinde interview ani parambeer singh allegation maha vikas aghadi udhhav thackeray sharad pawar anil deshmukh maharashtra politics)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांची एएनआयने मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत परमबीर सिंग यांच्या आरोपावर खळबळजनक माहिती दिली आहे. ''मला अटक करण्याचा डाव होता. याचच मला दु:ख आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना अटक करण्याचा त्यांचा विचार होता. या गोष्टी माझ्यासमोरच सुरू होत्या,असे शिंदे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! 36 विधानसभा मतदारसंघांसाठी ठरली रणनिती
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ''कारण फडणवीसांना अटक केल्यानंतर भाजपा बँकफुटवर जाईल. ज्यामुळे भाजपचे आमदार फुटतील आणि महाविकास आघाडीत येतील. तेव्हा मी त्यांना सांगितलेले हे बरोबर नाही आहे. पण त्यावेळी ते म्हणाले हे सर्व ठिक आहे, ते आपल्याला त्रास देतात तर हे सर्व करायचंय आणि आम्ही करणार'' असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.
हे वाचलं का?
''त्यांना अटक करताय, ते विरोधी पक्षातील नेते होते, पण जेव्हा त्यांच्यासोबत काम करणारा एकनाथ शिंदे 25 ते 30 वर्षापासून संयोगी राहिलाय. त्याला तुम्ही अटक करताय.याचच मला दु:ख आहे'', असे शिंदे यावेळी म्हणाले.
तसेच अनिल देशमुख गृहमंत्री असताना खुलेआम भ्रष्टाचार होत होता. ही गोष्ट मी मुख्यंमंत्र्यांना सांगितली होती. त्यामुळे त्यांना तसं भोगावं देखील लागले,असे एकनाथ शिंदे यांना यावेळी सांगितले. शरद पवार तुमची नेहमी भेट घेत असतात? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, शेतकऱ्याचे प्रश्न, साखर कारखान्याचे मुद्दे, सिंचन संबंधित मुद्यावर चर्चा करण्यासाठी ते भेटत असतात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, 'त्या' महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?
''गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हा मला झेड सुरक्षा प्रदान करायची होती तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी नकार दिला होता. मला माझ्या विरोधात काय काय गोष्टी चालल्या ते समजलं होतं. माझ्यासाठी ते शॉकिंग होतं. मला तेव्हा धमक्या आल्या होत्या. कारण नक्षल्यांचा खात्मा करण्याचं काम मी त्यावेळी केलं होतं. त्यावेळी मला झेड प्लस सुरक्षा देण्याचा विषय आला होता. गृहमंत्र्यांनी ठरवलं की झेड प्लस सुरक्षा द्यावी. मात्र उद्धव ठाकरेंनी फोन करुन मला तशी सुरक्षा देऊ नये सांगितलं. मला गृहमंत्री कार्यालयातूनच फोन आला होता. त्यावेळी मला अडकवण्याचा आणि तुरुंगात धाडण्याचाही प्रयत्न झाला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणावर शिंदे काय म्हणाले?
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. फडणवीसांचं सरकार जेव्हा होतं, तेव्हा मी त्याच सरकारमध्ये होतो. तेव्हा मराठा आरक्षण लागू केलं. हायकोर्टानेही त्याला मंजुरी दिली. पण दुर्देवाने सरकार बदललं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. सुप्रिम कोर्टात मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं. म्हणूत ते रिजेक्ट झालं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT