Jalna Maratha Andolan Update: ‘लाठीहल्ला करुन…’ संभाजीराजे संतापले, डागली तोफ
Sambhaji Chhatrapati : जालन्यातील मराठा क्रांती मोर्चावर लाठीहल्ला झाल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी घटनास्थळी येऊन एकदा तरी भेट घ्यावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
Sambhaji Chhatrapati : जालन्यातील मराठा आक्रोश मोर्चाच्या आंदोलनानंतर परिस्थिती चिगळले आहे. वातावरण तापले असल्यामुळेच अंतरवाली सराटीकडे आता राज्यातील नेत्यांनी धाव घेतली आहे. कालच शरद पवार (sharad pawar) यांनी भेट घेणार असल्याचे घोषित केल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji raje) यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी आंदोलनकर्त्यांबरोबरच महिला कार्यकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. (former mp Sambhaji raje chhatrapati criticized state government after lathi-charged Maratha Kranti Morcha)
ADVERTISEMENT
महिलांही जखमी
अतंरावली सराटीमध्ये मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलन पुकारले होते. त्यानंतर काल उपोषणामुळे त्यांची तब्बेत खालावली होती. त्यानंतर त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न झाले मात्र, ते गेले नाहीत. त्यानंतर थोड्याच वेळात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. या लाठीहल्ल्यात सामान्य नागरिकांसह महिला आणि पोलिसह जखमी झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापले आहे.
हे ही वाचा >>Jalna Maratha Akrosh Morcha : ‘त्या’ घटनेनंतर कुठे तणाव, तर कुठे आंदोलन; पवार आंदोलकांना भेटणार
गोळीबार कशासाठी…
आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला आणि हवेत गोळीबार केल्याने या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकार जोरदार निशाणा साधला.
हे वाचलं का?
दहशतवादी असल्याप्रमाणे मारहाण
वाहनांची जाळपोळ झाल्यानंतर आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मात्र संभाजीराजे यांनी आपण आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आजच त्यांनी सकाळी आंदोलनस्थळी दाखल होऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तर त्याच बरोबर ज्या महिला लाठीचार्जमध्ये जखमी झाल्या होत्या. त्यांचेही म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. यावेळी तेथील महिलांनी आमच्या दहशतवादी असल्याप्रमाणे पोलिसांनी मारहाण केली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी सरकारवर हल्लाबोल करत निशाणा साधला आहे.
राजर्षी शाहू महाराजांची आठवण
माजी खासदार संभाजीराजे यांनी बोलताना सांगितले की, माझ्या खापरपंजोबांनी पहिल्यांदा म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिले आहे. त्यांचा मी वारदार असल्यामुळेच ही भेट मला महत्वाची वाटत आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. आंदोलनकर्त्यांचा , आवाज थोपवण्यासाठी सरकारकडून हे प्रयत्न केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maratha Morcha: ‘अजितदादा सोबत आल्याने पवार चिडलेत’, जालना लाठीहल्ल्यावर बोलताना फडणवीसांनी डिवचलं
लोकांवर हातगोळाही फेकला
मागील गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन सुरु आहे मात्र त्यावेळेपासून मराठा समाजाने शांततेत मोर्चा केले आहेत. कुठंही गालबोट लागले नाही त्याचमुळे मराठा मोर्चाची साऱ्या जगात चर्चा सुरु झाली आहे. तरीही काल पोलिसांकडून अमानवी कृत्य, लाठीहल्ला, गोळीबार करण्यात आला. या आंदोलनात लोकांवर हातगोळाही उडवण्यात आला. त्यामुळे कालचा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी सरकारच तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT