शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
गेल्या लोकसभेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात तिहेरी आणि अत्यंत चुरशीची लढत झाली होती. यात हर्षवर्धन जाधवांना मिळालेल्या पावणे तीन लाखांपेक्षा अधिक मतांमुळे चंद्रकांत खैरेंच्या पदरात पराभव पडला.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024, Chhatrapati Sambhajinagar : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलीये… इच्छुकांच्याही पक्षश्रेष्ठीकडे येरझाऱ्या वाढल्यात… राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहेत. अशात इच्छुकांकडूनही बॅनर्स, होर्डिंगमधून संकेत दिले जात आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातही अनेक इच्छुक असल्याचे दिसत आहे.
हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे फुटीनंतर मविआत ठाकरे गट, तर युतीत शिंदे गटाने या जागेवर दावा ठोकलाय. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून दावे होत असताना आता संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स झळकलेत आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत इथे ‘खेला होबे’ बघायला मिळेल का अशी चर्चा झालीये. कारण 2019 च्या निवडणुकीत जाधवांमुळे शिवसेना-भाजपचे उमदेवार चंद्रकांत खैरे याचा ‘कार्यक्रम’ झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती 2024 बघायला मिळू शकते, हे नाकारता येत नाही.
लोकसभा 2019 : हर्षवर्धन पाटलांमुळे झाला होता ‘गेम’
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे युतीचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आघाडीचे उमेदवार म्हणून सुभाष झाबंड यांना तिकीट दिलं होतं. पण, लढत झाली ती एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात. त्यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र होते.
हेही वाचा >> Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!
पण, शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधवांमुळे या मतदारसंघाचा निकालाच बदलून गेला. शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या या लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तिजाय जलील विजयी झाले. यामागे हर्षवर्धन जाधवांची एन्ट्री खूप महत्त्वाची ठरली.