'एवढ्या लोकांना धोका देणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?', मनसेच्या 'त्या' नेत्याच्या तिरक्या विधानाचा अर्थ काय?
शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू होताच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका करत एक भुवया उंचावणारं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेनंतर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकीय भूमिकांवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या विश्वासार्हतेवर भाष्य केलं. एवढंच नव्हे तर थेच असंही म्हटलं की, अनेक लोकांना धोका देणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?
एकीकडे राज ठाकरे हे आपली किरकोळ भांडणं आहेत. तर उद्धव ठाकरे ती भांडणं मिटवायला तयार आहोत असं म्हणत असतानाच दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र, टीकात्मक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
युतीच चर्चा सुरू होत नाही तोवर संदीप देशपांडेंनी टीकाच केली सुरू
1. उद्धव ठाकरेंच्या भूतकाळातील वक्तव्य आणि कृतींवर टीका:
संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 2017 च्या वक्तव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "तुम्ही स्वतः म्हणालात की तुम्ही 25 वर्षे युतीत सडलात, मग 2019 मध्ये पुन्हा त्यांच्यासोबत का गेलात? तुमच्या बोलण्यात आणि कृतीत तफावत का?"