Ram Naik Exclusive : भाजपचं नाव कसं ठरलं? वाचा इनसाईड स्टोरी

साहिल जोशी

ADVERTISEMENT

%%excerpt%% How was the name of BJP decided? Ram Naik Exclusive
%%excerpt%% How was the name of BJP decided? Ram Naik Exclusive
social share
google news

BJP Foundation Day :

भारतीय जनता पक्ष (BJP) या सर्वात मोठ्या 6 एप्रिल हा स्थापना दिवसं. आजच्या दिवशी 44 वर्षांपूर्वी भाजपची स्थापना झाली. पण या पक्षाला हे नाव कसं मिळालं? याबाबत आजही अनेकांना माहित नाही. याच विषयावर भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मुंबई तकशी बोलताना इनसाईड स्टोरी सांगितली आहे. (How was the name of BJP decided? Ram Naik Exclusive)

काय म्हणाले राम नाईक?

१९८० च्या लोकसभा निवडणुकीनंतर इंदिरा गांधी विजयी झाल्या, आणि जनता पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर अध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर यांनी एक बैठक बोलावली. यात त्यांनी द्विसदस्याचा मुद्दा काढला. ते म्हणाले, जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापैकी एका पक्षाचं सदस्यत्व ठेवा आणि एक सदस्यत्व सोडा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : कर्नाटक निवडणुकांच्या तोंडावर सीमावाद पुन्हा चिघळणार? बोम्मईंनी शिंदेंना डिवचलं, दिला इशारा

इतकं स्पष्ट त्यांनी सांगितल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन वाक्यात सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि आमचा संबंध आई आणि मुलासारखा आहे. तुमचा आणि आमचा संबंध दोन वर्षांचा. स्वाभाविकपणे आम्ही आईचा संबंध सोडणार नाही, तुम्हाला काय कारवाई करायची तर करा. आमची ही भूमिका जनता पक्षातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नसणाऱ्या इतरही लोकांना पटलं. दरम्यान, आता या सगळ्यातून बाहेर पडायचं का? याबाबत निर्णय घेण्यासाठी काही निवडक लोकांची दिल्लीत एक बैठक बोलविण्यात आली. तारिख होती 6 एप्रिल 1980. त्यात ठरलं की, आपण जनता पक्षातून बाहेर पडायचं.

हेही वाचा : CM शिंदेंविरुद्ध थोपटले दंड! आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून देऊ शकतात आव्हान, हे आहेत पर्याय

भारतीय जनता पक्ष हे नाव कसं ठरलं?

यानंतर प्रश्न आला नव्या पक्षाच नाव काय ठेवायचं? काही जण म्हटले की, जुना जनसंघ होता तर तेच नाव ठेवू. त्यावर अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवानी यांचं मत होतं की, आपण भारतीय जनसंघ हे नाव घ्यायला नको. त्याऐवजी दुसरं नाव घेऊ. कारण जनसंघाबद्दल लोकांचं जे मत होतं तेच राहिलं, आणि नवीन आलेल्यांना कसं समावून घेऊ? तसंच जो जनता पक्ष 1977 ला स्थापन झाला होता, त्याच कामासाठी आपण आहोत, हे मत वाजपेयी यांनी मांडलं. म्हणजे त्यांचे जे तत्व होते, विचार होते, तेच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. फक्त बाहेर पडलो आहोत. त्यातूनच भारतीय जनता पक्ष हे नाव पुढे आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT