Independence Day 2024: विकसित भारतासाठी खास प्लॅन! PM मोदींच्या नव्या संकल्पात नेमकं काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

140 कोटी देशवासियांना PM मोदींचं आवाहन!

point

‘स्वातंत्र्य मिळालं पण लोकांना मायबाप संस्कृतीचा सामना करावा लागला’

point

शिक्षा नितीबद्दल पीएम मोदी काय म्हणाले?

India Independence Day 15 August 2024 PM Narendra Modi Speech : आपला भारत देश आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू स्वातंत्र्याच्या रंगात रंगली असली तरी आज पुन्हा सर्वांच्या नजरा पंतप्रधान मोदींकडे लागल्या आहेत. PM मोदींच्या भाषणाला लाल किल्ल्यावरून सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा विकसित भारतासाठीचा नवा प्लॅन पंतप्रधान मोदींनी देशासमोर ठेवला आहे. (Independence Day 2024 Special Plan for Developed India vikasit bharat What exactly is PM Modi new resolution)

ADVERTISEMENT

यंदाचा स्वातंत्र्यदिन अधिक खास आहे कारण आता देश विकसित भारत बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे, अशा परिस्थितीत त्याची खरी रूपरेषा आजपासूनच ठरवली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

हेही वाचा : Supriya Sule: 'भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि...', सुप्रिया सुळेंचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत

140 कोटी देशवासियांना PM मोदींचं आवाहन!

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझ्या देशबांधवांनो, स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. शेकडो वर्षांच्या गुलामीचा, तो काळ संघर्षाचा होता, तरुण, शेतकरी, वडीलधारी, आदिवासी, सर्वांनी गुलामगिरीविरुद्ध लढा दिला. किती यातना सहन केल्या, लोकांच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न झाला. स्वातंत्र्यापूर्वी 40 कोटी देशवासीयांनी दाखवली ती तळमळ, क्षमता... ते स्वप्न , संकल्प घेऊन चालले आणि लढत राहिले. एकच श्रद्धा होती, वंदे मातरम, एकच स्वप्न होते भारताच्या स्वातंत्र्याचे… आम्ही आहोत. अभिमान आहे की ते रक्त आपल्या नसांमध्ये आहे.

हे वाचलं का?

स्वातंत्र्यावेळी देशातील 40 कोटी लोकांनी जगातील सर्वात मोठी सत्ता उलथवून लावली होती. गुलामीचे साखळदंड तोडून टाकले होते. जर आपले पूर्वज ज्यांचं रक्त आपल्या नसांमध्ये आहेत तर आत्ता 140 कोटी देशातील माझे नागरिक माझ्या कुटुंबियांना जर संकल्प करुन आणि एक दिशा पकडून निघाले तर कितीही आव्हान येऊ दे, आम्ही समृद्ध भारत बनवू शकतो. 2047 विकसित भारताचं लक्ष्य प्राप्त करु शकतो. जर 40 कोटी देशवासी आपल्या पुरुषार्थाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असेल तर 140 कोटी देशवासिय त्याच भावनेनं समृद्ध भारतही बनवू शकतात."

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Aadhaar Card: 'ही' चूक असेल तर 1500 रुपये विसरा, चटकन 'हा' करुन घ्या बदल!

‘स्वातंत्र्य मिळालं पण लोकांना मायबाप संस्कृतीचा सामना करावा लागला’

“बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवे असेल तर ते बँकांमुळे शक्य होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण लोकांना मायबाप संस्कृतीचा सामना करावा लागला. सतत सरकारकडे मागावं लागायचं. आम्ही गर्व्हनन्स हे मॉडल बदलले. आज सरकार स्वत: लोकांपर्यंत जात आहे” असं PM मोदी म्हणाले.

ADVERTISEMENT

शिक्षा नितीबद्दल पीएम मोदी काय म्हणाले?

'माझे 140 कोटी देशवासिय तुम्ही जो आशिर्वाद दिला आहे त्यात एकच संदेश आहे, जन-जनची सेवा. नवीन उंची गाठण्यासाठी पुढे जायचं आहे. आज नवीन शिक्षा निती आणली आहे, जी 21 व्या शतकाच्या अनुरुप आहे. माझ्या देशातील युवकांना शिक्षणासाठी परदेशात जायची गरज लागू नये अशी शिक्षा नितीवर काम करत आहोत.' असंही PM मोदी म्हणाले.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT