India Alliance : इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द, ‘या’ मोठ्या कारणामुळे विरोधक एक पाऊल मागे
विरोधकांच्या इंडिया आघाडीची नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर इंडिया आघाडीने देशभरात जाहिर सभा घेण्याची घोषणा केली होती.त्यानुसार या सभेची सुरुवात ऑक्टोबरमध्ये मध्यप्रदेशच्या भोपाळमधून होणार होती. पण आता अचानक ही सभा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान ही सभा रद्द होण्यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊयात.(india […]
ADVERTISEMENT

विरोधकांच्या इंडिया आघाडीची नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर इंडिया आघाडीने देशभरात जाहिर सभा घेण्याची घोषणा केली होती.त्यानुसार या सभेची सुरुवात ऑक्टोबरमध्ये मध्यप्रदेशच्या भोपाळमधून होणार होती. पण आता अचानक ही सभा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान ही सभा रद्द होण्यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊयात.(india alliance madhya pradesh bhopal rally has been cancelled kamal nath shivraj singh chauhan)
दिल्लीतील इंडिया आघाडीची बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी पत्रकार परीषद घेतली होती.या पत्रकार परिषदेत वेणुगोपाल यांनी, इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशच्या भोपाळ या शहरात आयोजित करण्यात आलीय. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, अशी माहिती दिली होती. पण वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा :Satara: पुसेसावळीत तरुणाचा गेला हकनाक जीव, काळीज कातरणारा कुटुंबीयांचा हंबरडा
खरं तर इंडिया आघाडीची पहिली सभा रद्द होण्याच्या वृत्ताला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पीसीसी प्रमुख कमलनाथ यांनी दुजोरा दिला आहे. कमलनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भोपाळमध्ये इंडिया आघाडीची रॅली आयोजित केली जात नाही आहे. ती रद्द करण्यात आली आहे. पत्रकारांनी विचारले असता त्यांनी दोनदा रॅली रद्द झाल्याचा पुनरुच्चार केला.
मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना माध्यमांनी सभा रद्द झाल्याबद्दल विचारणा केली होती.यावर सुरजेवाला म्हणाले, आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेंणार आहोत, त्यानंतर रॅलीचा निर्णय होईल, अद्याप काहीही अंतिम नाही, असे त्यांनी सांगितले.










