Exclusive: इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक संपली…ग्रँड हयात हॉटेलमध्ये काय घडलं?
India alliance meeting exclusive update : भाजपविरोधी लढण्यासाठी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची मुंबईतल्या ग्रँड हॉटेलमध्ये सुरु असलेली 31 ऑगस्टची बैठक संपली आहे. या बैठकीचा तपशील अद्याप विरोधी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडला नाही आहे. मात्र आज तक आणि इंडिया टूडेने या बैठकीचा तपशील समोर आणला आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे.ज्यामध्ये जागावाटपावर लवकरात […]
ADVERTISEMENT
India alliance meeting exclusive update : भाजपविरोधी लढण्यासाठी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची मुंबईतल्या ग्रँड हॉटेलमध्ये सुरु असलेली 31 ऑगस्टची बैठक संपली आहे. या बैठकीचा तपशील अद्याप विरोधी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडला नाही आहे. मात्र आज तक आणि इंडिया टूडेने या बैठकीचा तपशील समोर आणला आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे.ज्यामध्ये जागावाटपावर लवकरात लवकर तोडगा काढावा,यावर चर्चा झाली. यासह समन्वय समितीत कोणत्या नेत्यांना संधी द्यावी, याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. यासोबतच भाजपला आगामी लोकसभा निवडणूकीत कोणत्या कोणत्या मुद्यावर घेरायचे आहे. याबाबत चर्चा झाली.(india alliance meeting exclusive update india today aajtak rahul gandhi sharad pawar grand hyat hyatte hotel)
ADVERTISEMENT
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीतला तपशील आता आज तक आणि इंडिया टूडेने समोल आणला आहे. त्यानुसार बैठकीत समन्वय समितीवर चर्चा झाली. समन्वय समिती दोन स्तरावर करण्यात येणार आहे. एक केंद्रीय स्तरावर आणि दुसरी राज्य स्तरावर असणार आहे. तसेच विविध राजकीय पक्षाकडून समन्वय समितीमध्ये कोणाला सहभागी करून घ्यायचे आहे, याबाबतही विचारणा केली जाणार आहे. तसेच विरोधकांचा एक प्रमुख नेमण्याऐवजी उपगट केले जाणार आहेत.
भाजप सध्या दहशतीत आहे, त्यामुळे लवकरात लवकर समन्वय समिती आणि इतर गट तयार करणे आवश्यक असल्याचे इंडिया आघाडीला वाटते. तसेच हा मुद्दा पुर्ण झाल्यावर ते जागा वाटपाबाबत देखील लवकर चर्चा करता येणार आहे. जर या गोष्टीस उशीर झाला तर भाजप विरोधकांच्या आघाडीत बिघाडी आणू शकते, असे इंडिया आघाडीला वाटतं आहे. भाजप लवकरच निवडणूकीची घोषणा करू शकते आणि त्यामुळे वेळ वाया घालवू नका, राजकीय मतभेद बाजूला सारा.,अजेंडा हा सर्वसामान्यांच्या समस्यांशी निगडित ठेवा, तसेच इंडिया आघाडी भविष्यातील रणनीती जलदगतीने ठरवेल, असेही इंडिया आघाडीचे म्हणणे आहे.
हे वाचलं का?
सर्व पक्षांना मुख्य समन्वय समिती आणि इतर समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळू शकत नाही त्यामुळे सर्व पक्षांमध्ये जबाबदाऱ्या वाटल्या पाहिजेत असे मत शरद पवारांनी बैठकीत मांडले आहे.
पंतप्रधान मोदी लवकर निवडणुका जाहीर करू शकतात. म्हणून लवकरात लवकर जागावाटपावर चर्चा करायला हवी असे इंडिया आघाडीच्या नेत्याचे म्हणणे आहे. जागावाटपात वेळ घालवू नका असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने सल्ला दिला आहे. तसेच अहंकार बाजूला ठेवा आधी देश मग पक्ष अशी भूमिका घ्या, असे देखील त्या म्हणाल्या आहेत. तसेच लवकरात लवकर सर्व समिती स्थापन करण्यात यावी, असेही मल्लिकाअर्जुन खरगे यांनी बैठकीत म्हटले आहे.
ADVERTISEMENT
आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासारख्या मुद्यावर लक्ष दिले पाहिजे, असे देखील बैठकीत ठरले आहे.दरम्यान आता इंडिया आघाडीची उद्या 1 सप्टेंबरला देखील बैठक होणार आहे. या बैठकीत समन्वय समिती आणि लोगो याबाबतचे गोष्टींवर स्पष्टता येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT