Irshalwadi Landslide : 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 27 जणांची दुर्दैवी मृत्यू,अखेर मृतांची नावं आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

irshalwali landslide 6 months girl and 27 people died raigad khalapur maharashtra
irshalwali landslide 6 months girl and 27 people died raigad khalapur maharashtra
social share
google news

रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडीत (Irshalwadi) दोन दिवसांपूर्वी दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेचा आता अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार या अपघातात आता एका 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 27 जणांची मृत्यू झाला आहे. तसेच या अपघाताली मृतांची नावे देखील समोर आली आहेत. तसेच या दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची तात्पुरत्या स्वरूपात सुर्या हॉटेल समोरील चौकात 34 कंटेनर उपलब्ध करून व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (irshalwali landslide 6 months girl and 27 people died raigad khalapur maharashtra)

अहवालात काय?

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत 19 जुलैला रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेने गावातील अनेक घरे दरडीखाली गाडली गेली होती. या घटनेची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला रात्री 11.32 वाजता प्राप्त झाली होती. त्य़ानंतर रात्री 12.40 पासून बचाव मोहिम राबवण्यात आली होती. बचाव पथकांनी राबवलेल्या मोहिमेत गावातील 124 जण सुखरूप असून 78 नागरीक अद्याप बेपत्ता आहेत, तर 27 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या मृतांची नावे देखील समोर आली आहेत. तसेच या अपघातात 22 जण जखमी झाले होते, यामधील 18 जणांवर उपचार घेऊन त्यांना सोडण्यात आले आहे. तर 4 अजूनही उपचार घेत आहेत.

हे ही वाचा : Irshalwadi Landslide: ‘आपल्याला लाज वाटली पाहिजे..’, इर्शाळवाडीला पोहचताच उद्धव ठाकरे संतापले

दरम्यान इर्शाळवाडीत 43 कुटुंबे राहायची. साधारण 229 लोकसंख्या या गावची होती. यामधील 124 नागरीक आता सुखरूप ठिकाणी आहेत. अंदाजे 78 नागरीक बेपत्ता आहेत. तर 27 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मृतांची नावे :

रमेश हरी भवर (26)
जयश्री रमेश भवर (22)
रूद्ग्रा रमेश भवर मुलगी (1)
विनोद भगवान भवर (4)
जिजा भगवान भवर (36)
आंबी बाळू पारधी(45)
बाळू नामा पारधी (52)
सुमित भास्कर पारधी (3)
सुदाम तुकाराम पारधी (3)
दामा भवर (40)
चंद्रकांत किसन वाघ( 18)
राधी रामा भवर (26)
बाळी नामा भूतांब्रा (70)
भास्कर बाळू पारधी (26)
जयश्री भास्कर पारधी (20)
अन्वी भास्कर पारधी (6 महिने)
कमल मधु भूतांबरे (45)
कान्ही रवि वाघ (45)
हसी पाडूरंग पारधी (50)
मधू नामा भूतांब्रा (55)
पाडुरंग घाऊ पारधी (55)
रवींद्र पदू वाघ (40)
नांगी किसान पिरकड (50)
पिंकी रमेश पारधी (23)
कृष्णा किसन पिरकड (32)
भारती मधू भूतांब्रा (18)
हिरा मधू भूताब्रा (16)

या दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची तात्पुरत्या स्वरूपात सुर्या हॉटेल समोरील चौकात 34 कंटेनर उपलब्ध करून व्यवस्था करण्यात आली आहे. या कुटुंबियांना वीज, पाणी, टॉयलेट इत्यादी मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Irshalwadiला पोहचलेल्या आदित्य ठाकरेंनी ‘असा’ दाखवला समजूतदारणा, म्हणाले…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT