शरद पवारांनी दिले वेगळेच संकेत; ‘त्या’ विधानाचा अर्थ काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच भाषणातील एका वाक्यामुळे पवारांना भविष्यातील राजकारणाबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे.
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत झालेल्या भूकंपाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शरद पवारांनी पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना केलेल्या भाषणात अचानक पक्षाध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानं मोठीच खळबळ उडाली. शरद पवारांच्या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच भाषणातील एका वाक्यामुळे शरद पवारांना भविष्यातील राजकारणाबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे.
शरद पवारांनी घोषणा केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवारांच्या या निर्णयाची देशभरात चर्चा सुरू आहे. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शरद पवारांवर निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी होत आहे. अशात शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात केलेल्या भाषणात एक महत्त्वाचा मेसेजही दिला आहे.
हेही वाचा >> ‘चोमडेगिरी vs चाटुगिरी’, नाना पटोलेंचा सुटला संयम, संजय राऊतही भिडले
राज्यसभा सदस्यत्वाचा 3 वर्षांचा कालावधीचा उल्लेख करताना शरद पवारांनी त्यांची भविष्यातील भूमिका काय असेल, त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असेल, याबद्दल त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना कल्पना दिली. यालाच जोडून त्यांनी पुढे एक विधान केलं. त्याचा नेमका अर्थ काय? पवारांना काय म्हणायचं आहे आणि पवार भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयासाठी जबाबदार नसणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले, “संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील 3 वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.”










