Kirit Somaiya: भाजपमध्ये खळबळ उडवून देणारं सोमय्यांचं 'ते' पत्र जसंच्या तसं...

मुंबई तक

ADVERTISEMENT

सोमय्यांचं 'ते' पत्र जसंच्या तसं...
सोमय्यांचं 'ते' पत्र जसंच्या तसं...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

किरीट सोमय्या यांचा लेटरबॉम्ब

point

किरीट सोमय्या यांच्या पत्रानंतर भाजपमध्ये खळबळ

point

वाचा किरीट सोमय्यांचं पत्र

मुंबई: भाजप हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे असा दावा नेहमीच करण्यात येतो. पक्ष नेतृत्व ज्या गोष्टी सांगतं त्या नेते आणि कार्यकर्त्यांना कराव्याच लागतात. मात्र, असं असताना भाजप नेते यांनी दिलेली जबाबदारी थेट धुडकावून राज्यातील नेतृत्वालाच खडे बोल सुनावले आहेत. ज्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (kirit somaiya letter that created a stir in bjp vidhansabha election 2024)

ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आज (10 ऑगस्ट) निवडणूक व्यवस्थापन समिती तयार केली. ज्यामध्ये निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आपली ही नियुक्ती न विचारता करण्यात आली असं म्हणत सोमय्या यांनी एक खरमरीत पत्रच भाजप नेतृत्वाला लिहलं.

हे ही वाचा>> Kirit Somaiya: 'अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका', किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब... भाजपमध्ये मोठी खळबळ

आतापर्तं भाजपमध्ये नाराजी ही बंद दाराआड व्यक्त केली जात होती. मात्र, आता किरीट सोमय्या यांनी अगदी उघडउघड पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर आपल्याच पक्ष नेतृत्वाला खडे बोलही सुनावले आहेत.

हे वाचलं का?

'ते' पत्र जसंच्या तसं... 

Dr. Kirit Somaiya
Chartered Accountant, Ph.D Former Member of Parliament
Bharatiya Janata Party

संदर्भ: केएस / मुंबई/02/1566/2024
दि. 10 सप्टेंबर, 2024

ADVERTISEMENT

प्रिय रावसाहेब,

ADVERTISEMENT

आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी.

18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हा पासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य / कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे.

हे ही वाचा>> Nagpur Car Accident: 'गाडी माझ्या मुलाच्या नावावर...', कार अपघात प्रकरणी बावनकुळेंचं प्रचंड मोठं विधान

मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जवाबदारी पार पाडली.

गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. 

या विभानसभा  निवडणुकीसाठीही मी स्वतः ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करीत राहणार.

आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अश्या प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो.

धन्यवाद !

आपला.
किरीट सोनिया (डॉ. किरीट सोमैया)

श्री. रावसाहेब दानवे
अध्यक्ष
निवडणूक प्रचार समिती
भाजपा, महाराष्ट्र.

प्रत : श्री. चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT