देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ प्रकरण काढलं बाहेर, नेमके आरोप काय?

मुस्तफा शेख

BMC CAG Audit: मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने ताशेरे ओढले आहेत. याबाबतची सगळी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis BMC Audit Report in Vidhansabha
Devendra Fadnavis BMC Audit Report in Vidhansabha
social share
google news

BMC CAG Audit Report: मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अडचणीत आणण्यासाठी विधानसभेतच थेट कॅगचा (CAG) मुंबई महापालिकेबाबतचा (BMC) ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवला. कॅगच्या मते मुंबई महापालिकेने कामांसाठी निधीचा निष्काळजीपणे वापर केला. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि कॅगने नेमकं काय म्हटलंय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (know what exactly the cag has alleged in 12 thousand crore audit of BMC what are exact allegations of devendra fadnavis)

कॅगने मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामाबाबत नेमकं काय म्हटलंय?

CAG चौकशी करण्याचा 31 ऑक्टोबर, 2022 चा आदेश

• मुंबई महापालिकेतील कामांची चौकशी
• 12,023.88 कोटी रूपयांचा BMC च्या 9 विभागांनी केलेला खर्च.
• 28 नोव्हेंबर, 2019 ते 31 ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील कामे.
• स्पेशल ऑडीटला 14 नोव्हेंबर, 2022 रोजी CAG ची मंजुरी
• BMC ने कोविड कायद्याचा आधार घेत 3538.73 कोटींची चौकशी न करण्याची भूमिका घेतली.

अधिक वाचा – “उद्धवजी, पुन्हा एकदा शांतीने विचार करा”, फडणवीसांची भेट, सुधीर मुनगंटीवारांची ऑफर?

CAG ची निरीक्षणे

1. BMC ने 2 विभागांची 20 कामे (214.48 कोटी) टेंडर न काढता दिली.
2. 4755.94 कोटींची कामे एकूण 64 कंत्राटदार आणि BMC यांच्यात करार नसल्याने एक्झिक्युट झाली नाही. करार नसल्याने BMC ला कारवाईचा अधिकार नाही.
3. 3355.57 कोटींच्या 3 विभागांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती नाही. त्यामुळे कामे कशी झाली, हे पाहणारी यंत्रणा नाही.

कॅगने काय म्हटले?

• पारदर्शकतेचा अभाव.
• सिस्टीमॅटिक प्रॉब्लेम
• ढिसाळ नियोजन
• निधीचा निष्काळजीपणे वापर

हे वाचलं का?

    follow whatsapp