Lok Sabha 2024 : ठाकरेंना 18, पवारांना 6 जागा; काँग्रेसने ठरवला ‘मविआ’चा फॉर्म्युला

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

what is congress seat sharing formula of maha vikas aghadi for lok sabha elections 2024?
what is congress seat sharing formula of maha vikas aghadi for lok sabha elections 2024?
social share
google news

Lok Sabha Elections 2024 India Alliance seat Sharing : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा गुंता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १८ जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या फॉर्म्युल्यात असून, वंचित आघाडीला दोन जागा दिल्या गेल्या आहेत. मात्र, काँग्रेसचा हा फॉर्म्युला ठाकरे-पवार आणि आंबेडकरांना मान्य होईल का? असा प्रश्न आहे. त्यामुळे अंतिम जागा वाटप कसे होणार याची उत्सुकता आणखी वाढली आहे. (what is congress formula of Maha Vikas Aghadi for Lok Sabha election 2024?)

ADVERTISEMENT

काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त दिले आहे. वृत्तानुसार काँग्रेसच्या समितीने महाराष्ट्रातील पक्षातील नेत्यांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागा वाटपाचा हा फॉर्म्युला तयार केला आहे. हा फॉर्म्युला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

महाविकास आघाडीसाठी काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात. शिवसेनेला १७ ते १८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सहा जागा मिळू शकतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या वंचित बहुजन आघाडीने १२ जागांची मागणी केलेली आहे. मात्र, काँग्रेसच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार वंचितला दोन जागा मिळू शकतात. राजू शेट्टी यांना एक जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे शेट्टी महाविकास आघाडीसोबत येऊ शकतात, या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> “अजित पवारांना 2019 मध्ये उपमुख्यमंत्री करणं ही सर्वात मोठी चूक”

दिल्लीत ठरला काँग्रेसचा फॉर्म्युला

काँग्रेसने देशातील जागावाटपासंदर्भात मंथन सुरू केलेलं आहे. यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली आहे. या समितीत काँग्रेसचे मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मोहन प्रकाश यांचा समावेश आहे. या समितीने काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांशी २९-३० डिसेंबर रोजी चर्चा केली.

हेही वाचा >> संजय राऊतांचा फडणवीस, शेलारांना ‘जालीम डोस’! दाखवला वाजपेयी-आडवाणींचा व्हिडीओ

काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाने २७ जागा लढवाव्यात अशी मागणी केली होती, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसकडून २१-२२ जागांची मागणी केली जाणार आहे. दोन-तीन जागा कमी मागण्याची तयारीही काँग्रेसची आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडी बाबत खरगे घेणार निर्णय

वृत्तानुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याबद्दल काँग्रेसचा निर्णय मल्लिकार्जून खरगे घेतली, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची वंचितबद्दलची भूमिका अजूनही समोर आलेली नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT