Lok sabha: पत्ता कट होताच, बिधुरींनी खंतच सांगितली, 'पक्षाबाहेरील लोकांसाठी पायघड्या अन्...'
लोकसभेच्या जागांसाठी आज भाजपने पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये काही जुन्या उमेदवारांना तिकीट न देता नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे काही जुने खासदार नाराज झाले आहेत, या कारणामुळेच रमेश बिधुरी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नव्या लोकांसाठी पायघड्या आणि जुन्या लोकांसाठी जुन्याच सतरंज्या

'जुन्या लोकांना जुन्याच सतरंज्या उचलायच्या'
Lok Sabha elections 2024: भारतीय जनता पार्टीकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीमध्ये दिल्लीतून 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, मात्र त्यापैकी 4 विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी (MP Ramesh Bidhuri) यांचाही पत्ता कट केलेल्या खासदारांमध्ये त्यांचे नाव आहे.
नव्या लोकांसाठी पायघड्या
लोकसभेच्या यादीतून आपला पत्ता कट झाल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याविषयी बोलताना आणि नव्या उमेदवारांवर निशाणा साधताना माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,'अनेकदा बाहेरून आलेल्या उमेदवारांसाठी येथे पायघड्या टाकल्या जातात, मात्र पक्षातील जुनी लोकं जुन्याच सतरंजीवर झोपत असतात' असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
आम्ही कार्यकर्ते
रमेश बिधुरी यांनी त्यांना तिकीट नाकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'पक्षाच्या हायकमांडला काय वाटले असेल, ते त्यांनाच माहिती आहे. हा पक्ष मोठा आहे. या पक्षात घराणेशाही नाही. तसेच आम्ही विचारांसाठी लढणारी लोकं आहोत, आणि महत्वाचं म्हणजे पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत.
हे ही वाचा >> 'संविधान वाचवण्यासाठीच आंबेडकरांनी साथ द्यावी', राऊतांची पुन्हा आंबेडकरांना हाक
मात्र जर पक्षात बाहेरून लोकं आली तर मात्र त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या जातात आणि जुनी लोकांना मात्र ना पायघड्या टाकल्या जातात, ना त्यांना नवं काही देतात. जुन्यात त्याच गोष्टीवर त्यांना थांबावे लागते. त्यामुळे पक्षातील जुन्या लोकांना मोठं मन करून थांबावं लागतं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.