Gram Panchayat Election Results Live : महायुतीकडे 600 हून अधिक ग्रामपंचायती, महाविकास आघाडीकडे किती ग्रामपंचायती?

ADVERTISEMENT

maharashtra 2369 gram panchayat election result 2023 counting of votes will be start
maharashtra 2369 gram panchayat election result 2023 counting of votes will be start
social share
google news

Maharashtra Gram Panchayat Election Result 2023 Live : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीसाठीचे मतदान रविवारी 5 नोव्हेंबरला पार पडले होते. या निवडणुकीत सरासरी 74 टक्के मतदान झाले आहे. या मतदानाला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. आज या ग्रामपंचायतीचा निकाल लागणार आहे. या निकालात कोण बाजी मारत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (maharashtra 2369 gram panchayat election result 2023 counting of votes will be start)

ग्रामपंचायतीच्या या निवडणूकीत दिग्गज नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील यासह इतर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता या निवडणूकीचा निकाल कसा लागतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटात चुरस पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने 300 चा आकडा गाठलाय. भाजपने 318 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर अजित पावर गटाने 216 जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाला 151 जागा जिंकता आल्या आहेत. तर ठाकरे गट 61, काँग्रेस 95 तर पवार गट 67 जागा जिंकल्या आहेत. राज्यात एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये महायुतीने 685 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडीला 223 जागा मिळाल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक निकाल LIVE

सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी चिकमहूदचा गड राखला

सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील चार पैकी खवासपूर, वाढेगाव, सावे तीन ग्रामपंचायतीवर शेकापने बाजी मारली. त्यामुळे येथे आमदार शहाजी पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. तर चिकमहूद ग्रामपंचायतीचा निकाल फक्त शाहजीबापू पाटील यांच्या बाजूने लागला आहे.

ADVERTISEMENT

पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व

पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व कायम राखले आहे.

ADVERTISEMENT

एकूण ग्रामपंचायत -53
बहिष्कार टाकलेली ग्रामपंचायत silate ( ता पालघर) 01

भाजप – 06
शिंदे गट – 03
अजित पवार गट – 00
उद्धव ठाकरे गट – 12
काँग्रेस -00
शरद पवार गट – 04
इतर – 13

बविआ 05
माकप 08
मनसे -1
एकूण निकाल – 52

भिवंडीत भाजपची बाजी

भिवंडीत 16 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. यावेळी निवडणूकीच्या निकालात भाजपने चांगलीच बाजी मारली असून 8 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. राहनाळ , नांदिठणे, वडूनवघर ,वज्रेश्वरी ,गोवे , काटई, भोकरी ,पहारे या ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत

16 सार्वत्रिक ग्रामपंचायत मतमोजणी

शिवसेना शिंदे गट – 01
शिवसेना ठाकरे गट – 01
भाजप- 08
कांग्रेस – 02
राष्ट्रवादी शरद पवार गट-00
राष्ट्रवादी अजित गट-00
गाव पॅनल – 04
एकूण निकाल – 16

भाजपा : राहनाळ , नांदिठणे, वडूनवघर ,वज्रेश्वरी ,गोवे , काटई, भोकरी ,पहारे

काँग्रेस : खोणी, चिंचवली तर्फे कुंदे

शिवसेना ठाकरे गट : कालवार

शिवसेना शिंदे गट : दिवे- केवणी

स्थानिक आघाडी : महाळूंगे, मोरणी ,पायगाव , कुसापुर

चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा विजय

चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला दिसून आलाय. आठही ग्राम पंचायती काँग्रेस आमदारांच्या क्षेत्रात होत्या हे विशेष. राजुरा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला रामपूरमध्ये यश मिळाले तर सास्तीमध्ये भाजपने सत्ता मिळविली. आर्वी गावात काँग्रेसने सत्ता राखली. वरोरा तालुक्यातील सालोरी येथे काँग्रेस तर ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे अपक्षाने बाजी मारली.

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी राखला गड

इंदापूरच्या बावडा ग्रामपंचायतीवर पुन्हा हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व कायम आहे. 17 पैकी भाजपाचे 12 सदस्य विजयी तर 5 ठिकाणी राष्ट्रवादीचे सदस्य विजयी झाले आहेत. पल्लवी रणजीत गिरमे सरपंचपदी 1432 मताने विजयी झाल्या आहेत. तर बावडा ग्रामपंचायतीवर काळेश्वर ग्रामविकास पॅनलचा विजय…

कापशी रोड ग्रामपंचायतीवर भाजपचा एक हाती सत्ता

अकोला तालुक्यातील कापशी रोड ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपच्या वेणूताई उमाळे या सरपंच पदावर निवडून आल्या आहेत. भाजपने या ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे.

परळीतील दोन ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडेंच्या गटाचा विजय 

परळी विधानसभा मतदारसंघांतील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणूकीत धनंजय मुंडे यांनी दोन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर पंकजा मुंडेच्या ताब्यात 1 ग्रामपंचायत आली आहे.

बीड विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली नेकनूर येथील ग्रामपंचायत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ताब्यात घेत पंकजा मुंडेंना धक्का दिला आहे.

सिंधुदुर्गात राणेंचा करिश्मा! पाच पैकी चार ग्रामपंचायतीत भाजपचा विजय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत भाजपची सरशी झाली आहे. जिल्ह्यात राणेंनी करिश्मा कायम ठेवून पाच पैकी चार ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाच पैकी दोन ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वर्चस्व मिळवले. तर भाजपने दोन ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला आहे.तर बहुचर्चित हुमरमळा अणाव ही एक ग्रामपंचायत ही गाव पॅनलकडे गेली आहे.

मालवण तालुक्यातील आचरा ही प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत भाजपने एक हाती मिळविली आहे.त्यामुळे कुडाळ मालवण मतदार मतदारसंघातील सहापैकी तीन ग्रामपंचायती भाजपकडे, दोन ग्रामपंचायती ठाकरे शिवसेनेकडे तर एक ग्रामपंचायत गाव पॅनलकडे गेली आहे. कुडाळ तालुक्यातील भडगाव ग्रामपंचायतीवर विजय मिळवत भाजपने आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला आहे.

साताऱ्यात शिंदे गटाने जिकल्या 4 ग्रामपंचायती

1) खटाव तालुक्यातील बहुचर्चित बुध ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांना धक्का दिला आहे. यामध्ये शिंदे गटाचे सरपंच आणि दहा सदस्य निवडून आले आहेत.

2) नवलेवाडी ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे ( शिवसेना शिंदे गट) गटाचा झेंडा सरपंच पदासह सहा उमेदवार विजयी.

3) पुसेगाव येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणूकीत आ. महेश शिंदे ( शिवसेना , शिंदे गट ) गटाचे घनश्याम मसणे विजयी झाले आहेत. या निवडणूकीतही आ. शशिकांत शिंदे यांना धक्का बसला आहे.

4) काटेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचपदाच्या उमेदवारांना समान 195 मते पडल्याने चिठ्ठीवर निर्णय झाला. आ. महेश शिंदे गटाचे ( शिवसेना , शिंदे गट ) सरपंच निवडून आले.

पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये अभिजीत पाटील गटाचा झेंडा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना धक्का देत अभिजीत पाटील गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिपक शिंदे विजयी झाला आहे. ईश्वर वठार ग्रामपंचायतीवर अभिजीत पाटील गटाचा झेंडा. अभिजीत पाटील गटाचे सरपंच पदाचे उमेदवार नारायण देशमुख विजयी झाले आहे.

विखे पाटील गटाला धक्का

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला आहे. वाकडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. विखे पाटील गटाचा पराभव झाला आहे तर भाजपच्या विवेक कोल्हे गटाचा विजय झाला आहे. सरपंचपदी रोहिणी बाळासाहेब आहेर विजयी ठरल्या आहेत.

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का, भाजपच्या राम शिंदेंनी मारली बाजी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. कर्जत तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायती तर जामखेड तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायती अशा एकूण 9 ग्रामपंचायती साठी निवडणूक पार पडली होती.

यामध्ये कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीवर आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. तर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये दोन ग्रामपंचायती या आमदार रोहित पवार यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे आली असून एक ग्रामपंचायत ही भाजपचे राम शिंदे यांच्याकडे गेली आहे.

एकूण कर्जत जामखेड मतदार संघातील नऊ ग्रामपंचायत पैकी सात ग्रामपंचायत मध्ये भाजपचे राम शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध केले असून आमदार रोहित पवार हे यामध्ये अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. निश्चितच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कर्जत जामखेड मधील लागलेला निकाल आमदार रोहित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मनसेने जिंकली पहिली ग्रामपंचायत

नाशिक जिल्ह्यात मनसेने खातं उघडलं आहे. नाशिकच्या जव्हाळे ग्रामपंचायीतवर मनेसेने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे संगीता कैलास गायकवाड यांनी 558 मते मिळवून सरपंचपदी निवड झाली आहे. तर विरोधी उमेदवार सीमा भाऊसाहेब पागेरे यांनी 394 मते मिळाली आहेत.

नारायणगाव ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि तमाशा पंढरी अशी ओळख असलेली नारायणगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकहाती सत्ता मिळवली आहे. 17 पैकी 16 उमेदवार ठाकरे गटाचे विजयी ठरले आहेत. तर विठाबाई भाऊ मांग यांच्या नात सुनबाई डॉ.शुभदा वाव्हळ यांची सरपंच पदी निवड करण्यात आली आहे.

अकोल्याच्या गाजीपूर ग्रामपंचायतीवर वंचितचा झेंडा

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालूक्यातल्या गाजीपूर ग्रामपंचायतीवर वंचितचा झेंडा फडकला आहे. वंचितच्या मिना सचिन दिवनाले 222 मतांनी विजयी ठरल्या आहेत. सातपैकी पाच जागा जिंकत वंचितची निर्भेळ सत्ता मिळवली आहे,

सोलापूरच्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

सोलापूरच्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपने विजयी झेंडा फडकवला आहे. भाजपने काँग्रेसची 25 वर्षांपासूनची सत्ता उलथून टाकत सरशी केली आहे. कासेगावातील 11 पैकी 9 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे भाजपचे यशपाल वाडकर सरपंचपदी विराजमान झाले आहेत.

सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना धक्का

सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सावे ग्रामपंचायतीवर शेकापने वर्चस्व कायम ठेवले आहे. शेकापचे विजय दीक्षित सरपंचपदी विजयी झाले आहेत

कराडच्या 8 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय

कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. 12 पैकी 8 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवत तालुक्यावर वर्चस्व मिळवले आहे. तर काँग्रेसने 3 ग्रामपंचायती स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले असून भाजपला केवळ एक ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे.

कराड उत्तर मधील सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार बाळासाहेब पाटील समर्थक राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर कराड दक्षिणेतील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे तर भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी रेठरेबुद्रुक येथील भाजपाचे सत्ता कायम ठेवत सर्वच अठरा जागांवर विजयी मिळवला आहे.

सोलापूरच्या मंगळवेढातील 8 ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भाजप आमदार समाधान अवताडे यांची सरशी. मंगळवेढातील 8 ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील देगांव, खडकी, जुनोनी, ममदाबाद, उचेठाण, बठाण, शेलेवाडी, अकोले या 8 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.

पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा झेंडा

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे आणि ईश्वरवठार या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये गुरसाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वात सत्ता आली. सर ईश्वरवठार ग्रामपंचायत वर सर्वपक्ष स्थानिक आघाड्याची सत्ता आली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीवर आमदार बबनदादा शिंदे यांच्या स्थानिक गटाला मोठा धक्का बसलेला पहायला मिळाला. गुरसाळे ग्रामपंचायतवर दीपक शिंदे तर नारायण देशमुख हे ईश्वरवाठार ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर निवडून आले आहेत.

कोल्हापूरात सतेज पाटील- महाडिक गटाला धक्का

कोल्हापूरच्या चिंचवाड ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल लागला आहे. या निकालात सतेज पाटील- महाडिक गटाला धक्का बसला आहे. अपक्षांनी मोट बांधत सरपंच सह 10 उमेदवार विजयी करून आणले आहेत आणि सत्ताधाऱ्यांना दणका दिला आहे. तर सत्ताधारी महाडिक गटाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे अपक्ष श्रद्धा पोतदार 33 मतांनी सरपंच पदी विजयी झाल्या आहेत.

अकोल्यात वंचित आणि ठाकरे गटाने खातं उघडलं

अकोल्याच्या मुर्तिजापूर तालूक्यातील गाजीपूर ग्रामपंचायतीत वंचित आणि ठाकरे गटाने खाते उघडले. जाहीर तीन सदस्यांच्या निकालात वंचितला एक जागा तर ठाकरे गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.

साताऱ्याच्या कराडमध्ये भाजपानं खातं उघडलं

साताऱ्यातील कराडच्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीत भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचा विजय झाला आहे. भाजपच्या पॅनलने या ग्रामपंचायतीत तर महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव केला.

बीडच्या गेवराई तालुक्यात अजित पवार गटाने खातं उघडलं

बीडच्या गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दोन ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. अमरसिंह पंडित यांनी दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत

सोलापूर जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

सकाळी : 10 वाजताचा निकाल
भाजप – 7
राष्ट्रवादी अजित पवार गट – 4
राष्ट्रवादी शरद पवार गट – 1
शिवसेना शिंदे गट – 1
शिवसेना ठाकरे गट – 1
काँग्रेस – 1
स्थानिक आघाडी – 7
एकूण = 22/ 101

कांबेरीवाडी ग्रामपंचायत शरद पवार गटाने जिंकली

साताऱ्यातील कराड कांबेरीवाडी ग्रामपंचायत शरद पवार गटाने जिंकली आहे.कराड कांबेरीवाडी ग्रामपंचायत आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आली आहे

कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायत साठी मतमोजणी सुरू झाली आहे. शेळकेवाडी येथे आठही जागांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या गटाने विजय मिळवला आहे

हेळगाव येथे माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी सह्याद्री पॅनलने विजय मिळवला. सरपंच पदासह सत्ताधाऱ्यांनी सात जागांवर तर विरोधकांना तीन जागांवर समाधान मानावे लागले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT