Ajit Pawar Candidates List: अजितदादांचा मोठा डाव, NCP ची पहिली यादी आली समोर

मुंबई तक

NCP Ajit Pawar Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये NCP ने 38 उमेदवारांना तिकीट दिलं आहे.

ADVERTISEMENT

अजितदादांच्या NCP ची पहिली यादी आली समोर
अजितदादांच्या NCP ची पहिली यादी आली समोर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांच्या उमेदवारांची यादी

point

पहिल्या यादीत बड्या नेत्यांना संधी

point

कुणाला मिळाला डच्चू ?

Maharashtra Assembly Election 2024 NCP (Ajit Pawar) 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने रविवारी पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानेही पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत निर्णायक आहे. कारण या निवडणुकीत अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं सर्वस्व पणाला लागलं आहे. अशावेळी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर आहे.

अजित पवारांचा मोठा डाव

दरम्यान, यादी जाहीर करताना अजित पवार यांनी एक मोठा डाव टाकला आहे. आतापर्यंत अजित पवार हे बारामतीमधून लढणार की नाहीत असा संभ्रम कायम होता. मात्र, आता तेच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आता समोर आलं आहे.

हे ही वाचा >> Mahayuti : अजित पवारांमुळेच महायुतीला धोका? काय आहे राजकीय अर्थ?

भाजपने पहिल्या यादीत 99 जागांवर उमेदवार घोषित केले. तर आता अजित पवारांनी देखील आपल्या पक्षाकडून 38 उमेदवांरांची नावं जाहीर केली आहेत. ज्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये धनंजय मुंडे, आदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ या सारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp