Cabinet Portfolio: मोठी बातमी… राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकारसह मोठी खाती, शिवसेनेला दणका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. खातेवाटपाची यादी ही आता निश्चित झाली आहे. पाहा कोणाला कोणती खाती मिळाली
ADVERTISEMENT
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एंट्री करून अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बारा दिवस झाले तरी कोणतीही खाती मिळालेली नाहीत. मात्र, आज (14 जुलै) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. खातेवाटपाची यादी ही आता नुकतीच राजभवनाकडे गेली असून आता राज्यपालांचा त्यावर सही होणं फक्त बाकी आहे. खात्रीलायक माहितीनुसार, अजित पवार त्यांच्या नऊही आमदारांना अनेक चांगली खाती मिळालेली आहेत. पण याचा सर्वाधिक फटका हा मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्यांनाच बसल्याचं पाहायला मिळतं आहे. (maharashtra cabinet portfolio list allocation ajit pawar ncp finance cooperative agriculture women child development food and civil supplies latest update on maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मिळाली ‘ही’ खाती
1. अर्थ
2. सहकार
3. कृषी
4. महिला व बालकल्याण
5. मदत व पुनर्वसन
6. वैद्यकीय शिक्षण
7. क्रीडा
8. अन्न व नागरी पुरवठा
9. अन्न आणि औषध प्रशासन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांना कोणती खाती मिळाली?
- अजित पवार – अर्थ
- धनंजय मुंडे – कृषी
- दिलीप वळसे पाटील – सहकार
- हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
- छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा
- धर्मराव अत्राम – अन्न आणि औषध प्रशासन
- अनिल भाईदास पाटील – क्रीडा
- अदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण
अजित पवार शिवसेनेत येण्याआधी शिंदे-फडणवीसांच्या मंत्र्यांकडे कोण-कोणती खाती होती?
भाजपकडे कोणती खाती होती?
हे वाचलं का?
1) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस– गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार
2) राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
ADVERTISEMENT
3) सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
ADVERTISEMENT
4) चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
5) डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
6) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
7) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
8) सुरेश खाडे- कामगार
9) अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
10) रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
हे ही वाचा>> पाच अफेअर्सनंतर सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न, कोण आहे ‘हा’ 57 वर्षीय अभिनेता?
शिवसेना (शिंदे गट) मिळालेली खाती
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे– सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ
2) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
3) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
4) संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
5) संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
6) उदय सामंत- उद्योग
7) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
8) अब्दुल सत्तार- कृषी
9) दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
10) शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
ही खाती आधी शिंदे-फडणवीस यांच्या पक्षातील मंत्र्यांकडे होती. मात्र, आता अजित पवारांच्या एंट्रीने यात सगळे मोठे फेरबदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा>> मोठी बातमी: सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांना बजावली नोटीस, पण…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT