Maratha Reservation: 'मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना...', मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

point

फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

point

मनुस्मृतीला स्थान नाही- अजित पवार

Cm Shinde on Maratha and OBC Reservation : 'मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गीय (OBC) किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही,' असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'सत्ताधारी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युती जनतेला फक्त आश्वासन देणार नाही. तर, विधानसभेच्या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा लाभ देणार आहे.' (maharashtra cm eknath shinde said no injustice will happen to obc while giving reservation to marathas)

ADVERTISEMENT

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्यासाठी महायुती सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला विशेष अधिवेशन बोलावले होते. मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली मराठे ओबीसी प्रवर्गात आरक्षणाची मागणी करत आहेत, तर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध करत आहेत."

हेही वाचा : फडणवीस-पवार बाजूला अन् CM शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरून विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने (MVA) बहिष्कार केला होता. तसेच, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

हे वाचलं का?

यादरम्यान, 'सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही. सरकारने केलेली विकासकामे विरोधकांना दिसत नाही आहेत.' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. तसंच, मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री म्हणाले, 'महाराष्ट्र हे गुंतवणुकीचे ठिकाण बनले आहे.'

हेही वाचा : AFG vs SA: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास; अफगाणिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये धडक!

फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

विरोधक खोटे बोलत असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'सरकार पावसाळी अधिवेशनात खोट्या नरेटिव्हची पोलखोल करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विदर्भातील एकही सिंचन प्रकल्प का मंजूर केला नाही, हे विरोधकांनी स्वतःला विचारावे?' असा थेट सवालही फडणवीसांनी विरोधकांना केला आहे. 

ADVERTISEMENT

काँग्रेसवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 99 जागा जिंकल्या आहेत, जे गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक आहेत. त्यांना 240 चा आकडा गाठण्यासाठी 25 वर्षे लागतील. पीएम मोदी जिंकले आणि तुम्ही हरले.' 

ADVERTISEMENT

हेही वाचा : सायन-कोळीवाडा पुन्हा भाजपचा?, मविआ करणार बालेकिल्ला सर?

मनुस्मृतीला स्थान नाही- अजित पवार

मनुस्मृतीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "सरकार अधिवेशनादरम्यान चर्चेसाठी आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार आहे. सरकारची पूर्ण तयारी आहे." तसंच अभ्यासक्रमात प्राचीन ग्रंथाच्या कथित उल्लेखावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्रासारख्या राज्यात मनुस्मृतीला स्थान नाही."

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT