Vidhan Parishad Election : 'ती' तीन मतं कुणाचा करणार गेम?
maharashtra mlc election 2024 : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी 23 आमदारांच्या मतांची आवश्यकता असणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बविआचे तीन आमदार कुणाला मतं देणार
बविआचे तीन मतं कुणाचा गेम करणार
अपक्ष उमेदवाराच मतं मौल्यवाण असणार आहे.
maharashtra mlc election 2024 : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या (MLC) 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्या 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी 23 आमदारांच्या मतांची आवश्यकता असणार आहे. या निवडणुकीत एक एक मतं मौल्यवाण आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या मतांची मोठी मागणी आहे. त्यामुळे या निवडणुकीत हितेंद्र ठाकुरांच्या बविआच्या तीन आमदार कुणाला मतं देणार आणि कुणाचा गेम करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (maharashtra mlc election 2024 hitendra thakur bahujan vikas aghadi three vote can change game in election)
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक अपक्ष उमेदवाराच मतं मौल्यवाण असणार आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या तीन मतं खूप निर्णायक ठरणार आहेत. पण ही तीन मतं कुणाला विजय मिळवून देणार आणि कुणाचा गेम करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीवर हितेंद्र ठाकुर काय म्हणालेत पाहूयात.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election: कोणासोबत होणार दगाफटका? आमदारांची मतं कोणाला बनवणारं आमदार?
हिंतेंद्र ठाकुर यांनी एबीपी माझाशी बातचीत केली आहे. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की, माझी भूमिका, माझी लोकं, माझी जिल्हा, माझा तालूका यांच्याकरता असते. आम्हा तिघांना आमच्या जिल्ह्यातील लोकांना निवडून दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या भल्याचा निर्णय़ घेऊ असे हितेंद्र ठाकून यांनी सांगितले आहे.
हे वाचलं का?
महायूती की महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकणार? यावर ठाकूर म्हणाले, ते उद्या आम्ही ठरवणार आहोत. आणि आमचा पाठिंबा हा आमचा आम्हालाच असतो. तसेच मला मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, शरद पवार भेटले. मुख्यमंत्र्यांना भेटलो दोन तीन वेळा, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. आज पण अनेकांना भेटलो. अनेक उमेदवारांना आणि अनेक नेत्यांना भेटलो. माझे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत, असे हितेंद्र ठाकुरांनी सांगितले.
मतांच्या घोडेबाजाराबद्दल बोलताना ठाकुर म्हणाले की, 35 वर्षात माझ्याबद्दल कुणाकडे ऐकलं आहे का? काय एक पेक्षाचे देण गेण केलं हितेंद्र ठाकुरांनी. घोडे बाजार, बैल बाजार, टांगा बाजार यांच्यात मी कधीही सामीला झालो नाही. आणि आयुष्यात माझ्या आमदारांनाही होऊन देणार नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pooja Khedkar: पूजा खेडकरांना मोदी सरकारकडून मोठा धक्का, IAS ची नोकरीच धोक्यात?
क्रॉस वोटींगवर ठाकूर म्हणाले की, आम्ही तिघे वेगवेगळे राहतो. बंदोबस्ताला आम्ही एका ठिकाणी राहतो. उद्याला बसणे येणार मागे पुढे पोलीस असणार, असं आमचं काही नाही, आम्ही तीन जण तीन ठिकाणी वेगळे, आमच्या तिघांमधून कोणाला पळवतील, असं पण मला वाटत नाही. आमच्या तिघांमधून कुणी स्वता:च्या मर्जीने जाईल अशीही शक्यता कमीच आहे. त्यामुळे उद्या आम्ही एकच येऊ आणि कुणाला मतं द्यायचं हे ठरवू असे ठाकूर म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT