Manoj Jarange Exclusive : ''विधानसभेत कार्यक्रम...सुपडाच साफ करणार'', जरांगेंनी सांगितला प्लॅन?

अभिजीत करंडे

ADVERTISEMENT

manoj jarange exclusive interview on vidhan sabha election 2024 maha vikas aghadi mahayuti maharashtra politics
जरांगे विधानसभेच्या तयारी लागले आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जरांगे विधानसभेच्या तयारी लागले आहेत.

point

मराठे उमेदवार देणार नाही आणि उमेदवार पाडणार सुद्धा

point

विधानसभेत पुर्ण कार्यक्रम करणार, सुपडा साफ करणार

Manoj Jarange Exclusive Interview : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी तयारी सूरू केली आहे.एकीकडे सर्वच पक्ष तयारीला लागले असताना दुसरीकडे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभेच्या तयारी लागले आहेत. यावेळी विधानसभेत पुर्ण कार्यक्रम करणार, सुपडा साफ करणार, काही ठेवणार नाही. वेळ आले तर मराठे उमेदवार देणार नाही आणि उमेदवार पाडणार सुद्धा,असा इशारा मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला आहे. (manoj jarange exclusive interview on vidhan sabha election 2024 maha vikas aghadi mahayuti maharashtra politics) 

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटलांची मुंबई तकवर मुलाखत पार पडली आहे. या मुलाखतीत जरांगे पाटलांनी अनेक मुद्यावर बेधडक उत्तर दिली आहेत. जरांगे ठाकरे, पवारांच्या बाजूने बोलतात, असा आरोप त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून होतोय. यावर बोलताना जरांगे म्हणाले,  ''सध्या सत्तेत आहे त्यालाच प्रश्न विचारणार ना? विरोधकांना त्यावेळी काय दिलं नाही म्हणून तर लोक तुमच्या मागे लागलेत ना. आणि असे कुठते असते का? त्यांनी नाही दिलं तर मग आम्ही पण देणार नाही, त्याला विचारा ही कुठली सत्ता चालवता तुम्ही? असा खडा सवाल जरांगेंनी महायुती सरकारच्या नेत्यांना केला आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?

राज्यातल्या दोन्ही आघाड्या या नाटकी आहेत त्याचं ते भागवून घेतात, त्यांना सत्तेच्या बाहेर राहायचे नाही. अडीच वर्ष हे राहिले अडीच वर्ष ते राहिले आणि वाटोळ आमच्या समाजाच केलं, असा हल्ला देखील जरांगेंनी महायुती आणि महाविकास आघाडीवर केला. 

हे वाचलं का?

जरांगेंनी यावेळी विधानसभेचा प्लॅन देखील सांगितला आहे. सत्ताधारी जर आमच्यावर असा आरोप करणार असतील तर विधानसभेत पुर्ण कार्यक्रम करणार, तुमचा सुपडा साफ करणार, काही ठेवणार नाही. वेळ आले तर मराठे उमेदवार देणार नाही पण तुमचे उमेदवार पाडणार देखील असा इशारा त्यांनी महायुतीला दिला आहे. तसेच सध्या फिटरलाच किंमत आहे गाडीवाल्याना नाही आणि फिटर देवेंद्र फडणवीस आहे. कुणाचा नट ढिला ठेवेल आणि कुणाचा टायर पळवून लावेल याचा मेळच लावून देत नाही, अशी टीका जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 80 लाख महिलांच्या खात्यात 3000 झाले जमा, तुमच्या अर्जाचं काय?

जरांगे पुढे म्हणाले, 29 तारखेला आम्ही बैठक लावली आहे. या बैठकीत आम्ही सगळे निर्णय घेणार आहोत. विधानसभेत लढायचं की पाडायचं हा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यामुळे आता मराठ्यांचा गनिमी कावा आणि डाव काय असेल हे त्यांना कळणार आहे, असे देखील जरांगेंनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT