एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन अर्जून खोतकर मनोज जरांगे पाटलांना भेटले, काय झाली चर्चा?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

GRmanoj jarange patil agitation arjun khotkar offer to discuss in mumbai eknath shinde maratha reservation
GRmanoj jarange patil agitation arjun khotkar offer to discuss in mumbai eknath shinde maratha reservation
social share
google news

महायुती सरकारने बुधवारी निजामकाळातील नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला.सरकारच्या या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण कायम ठेवत जीआरमध्ये काही बदल सुचवले होते. या सूचनेनंतर आज पुन्हा सरकारच्या वतीने अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीत खोतकर यांनी जीआरमधील बदलासाठी मनोज जरांगे पाटलांना मुंबईत बोलावून चर्चेचे आमंत्रण दिले आहे. हे आमंत्रण आता जरांगे पाटील यांनी स्विकारले आहे. (manoj jarange patil agitation arjun khotkar offer to discuss in mumbai eknath shinde maratha reservation)

शिंदे सरकारच्या वतीने आज पुन्हा अर्जुन खोतकर जालन्यात दाखल झाले होते. यावेळी अर्जुन खोतकर यांनी सरकारचा जीआर मनोज जरांगे पाटलांकडे सूपूर्द केला होता.यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले की,आमच्यापेक्षा जरांगे पाटलांची यंत्रणा मजबूत आहे, जीआर येण्याच्या अगोदरचं त्यांनी जीआर नाकारला असल्याचे यावेळी खोतकर म्हणाले.

हे ही वाचा : डेबिट कार्डची लागणार नाही गरज, UPI द्वारेच ATM मधून काढता येणार पैसे!

दरम्यान पुढे अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटलांना चर्चेचे आमंत्रण दिले. खोतकर म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने मनोज जरांगे पाटलांना मुंबईत चर्चेचे आमंत्रण देतो. जरी जीआर नाकारला असला तरी जरांगे पाटलांना जे बदल सुचवायचे आहेत, ते त्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर, वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयात येऊन सुचवावेत. जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी शिष्टमंडळ पाठवावे, अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी केली. तसेच जरांगे पाटलांचे शिष्टमंडळ घेऊन जाण्याची तयारी मी पार पडतो,असे देखील खोतकर म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1967 च्या नोंदी आणि जे बदल मनोज जरांगे पाटील त्यांच्या शिष्टमंडळाला सांगतील. ते बदल शक्य आहेत का? याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. हे निमंत्रण मान्य केल्याबद्दल मी जरांगे पाटलांचे अभिनंदन करतो, असे खोतकर म्हणाले आहेत.

आपल्याला काम करुन न्याय द्यायचा आहे, त्यामुळे आमचं शिष्टमंडळ 100 टक्के येणार आहे,अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली. तसचे खोतकरांनी सांगितलं तुम्ही जिथपर्यंत सुधारणा करून घेऊन येत नाही,तिथपर्यंत मी पाणी पिणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजला न्याय मिळणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरूणाची आत्महत्या, तळ्यात उडी घेऊन संपवलं जीवन

मुख्यमंत्री शिंदे यांनी मागेही मोठे मोठे निर्णय़ घेतले आहेत. साहेब महाराष्ट्रातील मराठा समाज न्यायाची वाट बघत आहे, तुम्ही इतकं करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचून, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT