Manoj Jarange : महायुतीला धसका! विधानसभेआधी जरांगेंचा क्लिअर 'मेसेज'

मुंबई तक

Maharashtra Vidhan Sabha election 2024 : आठही लोकसभा मतदारसंघातील निकाल बघितले, तर महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मते लक्षात येतात. मराठवाड्यातील औरंगाबाद हा एकमेव मतदारसंघा महायुतीला मिळाला आहे.

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला १३ जुलैपर्यंतची वेळ दिली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आरक्षण आंदोलन स्थगित

point

मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंत दिली सरकारला वेळ

point

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा बसला मोठा फटका

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभराचा वेळ देताना शिंदे सरकारचं टेन्शन वाढवून ठेवलं आहे. ८ जून रोजी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी १३ जून रोजी उपोषण स्थगित केले. मागण्या झाल्या नाही, तर विधानसभा निवडणुकीत उडी घेणार आणि नाव घेऊन उमेदवार पाडणार, असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला. लोकसभा निवडणुकीत जबर झटका बसलेल्यानंतर आता सत्तेत असलेली महायुती सावध पावलं टाकताना दिसत आहे. (Manoj Jarange patil ultimatum to Shinde Government)

मनोज जरांगे हे उपोषणाला बसल्यानंतर त्यांची सरकार किंवा राज्यातील आणि देशातील लोकप्रतिनिधी जास्त दखल घेताना दिसले. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल.

हेही वाचा >> 'अमित शाहांना सांगितलेलं शिवसेना पक्ष चिन्ह काढू नका...', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट 

मराठा आरक्षणाचं केंद्र राहिलेल्या भागात महायुतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठपैकी तब्बल सात लोकसभा मतदारसंघ महायुतीला गमवावे लागले आहेत. इतकंच काय तर जे लोकसभा मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. तेही यावेळी ढासळले आहेत.  

हे समजून घेण्यासाठी आठही लोकसभा मतदारसंघातील निकाल बघणे महत्त्वाचे आहे...

1) औरंगाबाद लोकसभा निवडणूक

संदिपान भुमरे 476130 
इम्तियाज जलील 341480
चंद्रकांत खैरे 293450

हे वाचलं का?

    follow whatsapp