Maratha Reservation: ‘सरकार इतकं नालायक असू शकतं का?’, मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे कडाडले

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Maratha Reservation Criticism of Manoj Jaranage Patil On Government of Maharashtra
Maratha Reservation Criticism of Manoj Jaranage Patil On Government of Maharashtra
social share
google news

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगेंसह (Manoj Jarange Patil) समस्त मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे. आतंरवाली सराटीतून ते आज (20 जानेवारी) सकाळी निघाले. यावेळी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maratha Reservation Criticism of Manoj Jaranage Patil On Government of Maharashtra)

ADVERTISEMENT

तसंच, ते भावूक आणि आक्रमही झाल्याचं पाहण्यास मिळालं. ‘प्राण गेला तरीही आता मागे हटणार नाही. मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळ दिला आहे. तरीही आरक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे मुंबईला गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. सात दिवसांमध्ये आम्ही मुंबईला पोहचणार,’ असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचा : NCP : शरद पवारांचा अजितदादांवर पलटवार, ‘तरूण असताना…’

‘आपली मुलं मरत असताना सरकारला झोप कशी येते?’- जरांगेंचा परखड सवाल

मनोज जरांगे पाटील आक्रमक होत म्हणाले की, ‘आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे. अनेक घरांमधला कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे, निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे.’ असं म्हणत त्यांनी सरकारला सुनावलं.

हे वाचलं का?

वाचा : Manoj Jaranage: मुंबईला निघालेल्या जरांगेंचा कंठ दाटला, पाणावले डोळे; का झाले भावुक?

‘माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही’

‘मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाहीये. पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे. आमचं आंदोलन मुंबईत पोहचल्यावर कोट्यवधी मराठे मुंबईत दिसणार आहेत. राज्यभर आम्ही आमच्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लढणार आहोत. ही आरपारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठा बांधवांना विनंती आहे.’ अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT