अजित पवार मुख्यमंत्री होणार? उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिला मोठा प्रस्ताव
महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव
ADVERTISEMENT
मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीची चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता महाविकास आघाडी एकत्र राहण्याच्या दृष्टीने शिवसेना (UBT) पक्षानेच पुढाकार घेतला असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी ‘मुंबई तक’ला दिली आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. याच प्रस्तावाबाबत ‘मुंबई तक’च्या आजचा मुद्दा या कार्यक्रमात चर्चा पार पडली. (May Ajit Pawar Become next Chief Minister of Maharashtra from Mahavikas Aaghadi, Proposal by Uddhav Thackeray)
ADVERTISEMENT
नेमकं काय घडतयं राज्याच्या राजकारणात?
अजित पवारांच्या बंडखोरीची चर्चा मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सध्याचे शिंदे सरकार कोसळल्यास 40 आमदारांसह अजित पवार भाजपसोबत जातील आणि सरकार स्थापन करतील. तसंच शिंदे पॅटर्नप्रमाणेच अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशा प्रकारच्या विविध चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चा अजित पवार यांनी फेटाळल्या आहेत.
‘शिंदे सरकार 15 दिवसात पडणार..’, संजय राऊतांच्या दाव्यामागची काय आहे कहाणी?
मात्र अशातच शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणार विधान केलं. 2024 च्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सोबत लढेल काय? यात वंचित आघाडी पण एकत्र येईल का, असा प्रश्न पत्रकारांनी अमरावतीमध्ये शरद पवार यांना विचारला होता. यावर पवार यांनी वंचित आघाडीशी आमची चर्चाच झालेली नाही. वंचितसोबत फक्त कर्नाटकातील जागांशिवाय चर्चा झाली. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही, हे आत्ताच कसे सांगणार? आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे पण एकत्र लढण्याची इच्छा पुरेशी नसते, जागांचे वाटप, त्यातले काही इश्यू आहेत, हे अजून केलेच नाही. तर कसे सांगता येईल, असे उत्तर त्यांनी दिले.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरे यांचा शरद पवार यांना प्रस्ताव :
दरम्यान, या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याची तयारी दाखविली असून तसा प्रस्तावच त्यांनी दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी ‘मुंबई तक’ला दिली आहे.
काय आहेत ठाकरेंचे प्रस्ताव :
- महाविकास आघाडीमध्ये कोणाला जागा कितीही आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, अशी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना ग्वाही दिली.
ADVERTISEMENT
- १९९९ मध्ये, २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. त्यामुळे आता संधी मिळाल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असणार.
ADVERTISEMENT
- उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व. पण महाविकास आघाडीचा नेता, नेतृत्व कोणीही करत असो, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल.
- अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी हरकत नाही.
असे चार प्रस्ताव ठाकरे यांनी पवारांना दिले असल्याची माहिती आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, राष्ट्रवादी राहिली तरच महाविकास आघाडी पुढे जाऊ शकेल, असं ठाकरे यांना वाटत असल्यानेच पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असणार, यासाठी तयारी दाखविली आहे. भाजपने जी ऑफर राष्ट्रवादीला दिली आहे, तिच ऑफर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला देऊन पवारांपुढ पेच उभा करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी म्हणाले, मध्यंतरी सिल्वर ओकवर ठाकरे-पवार भेट झाली, त्यावेळी याबाबत बोलणी झाली असण्याची शक्यता आहे. त्यात अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे, पण त्यांना थांबवायचं असेल तर तुम्हाला त्याग करावा लागेल, अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता, असा मेसेज पवारांनी ठाकरे यांना दिला असावा. यातूनच येणाऱ्या काळात राष्ट्रावादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा प्रस्ताव ठाकरेंनी पवारांना दिला असावा
उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?, अजित पवारांनी सांगितली Inside Story
अजित पवार यांनी सकाळच्या मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्ट केलं की, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचे आकर्षण नसून आता ध्येय मुख्यमंत्री पद हे आहे. त्यातूनच त्यांनी 2024 कशाला आताही मुख्यमंत्री होण्याची तयारी आहे, असं म्हटलं असावं. तसंच आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकतात. तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मेंटॉर म्हणून काम करतील, अशा काही शक्यताही सुधीर सुर्यवंशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
या प्रस्तावावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर म्हणाले, 2024 मध्ये शरद पवार यांच्या आग्रहाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे अनेकदा अनेकांनी स्पष्ट केलं. ते मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत, असं दिसत नाही. पण त्या तुलनेत अजित पवार हे मुख्यमंत्रीपदासाठी खूप वर्षांपासून आग्रही आहेत, त्यासाठी ते काम करत आहेत. त्यामुळेच ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भविष्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसला ही ऑफर दिली असावी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT