Vidhansabha Election 2024 : ठरलं! विधानसभेत मनसेचा झेंडा फडकणार? 'इतक्या' जागांवर लढणार निवडणूक
Raj Thackeray Amravati Visit :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही रणशिंग फुंकलं आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मनसे 230 जागा लढवणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मनसे किती जागा लढवणार?
राज ठाकरेंच्या अमरावती दौऱ्यात काय चर्चा झाली?
देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार
Raj Thackeray Amravati Visit :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही रणशिंग फुंकलं आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मनसे 230 जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही मनसेचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे. मनसेनं स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. विदर्भाच्या सर्व मतदारसंघात मनसे त्यांच्या उमेदवार उभा करणार आहे.
फडणवीसांचा नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसे त्यांचा उमेदवार उभा करणार आहे. अमरावतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ठाकरेंनी उमेदवार निवडीबाबत चर्चा केली. मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांनी म्हटलंय की, नवरात्री उत्सवादरम्यान सर्व उमेदवारांची यादी घोषित केली जाईल.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi: कुणा कुणाचा बँक बॅलेन्स वाढणार? 'या' राशींवर पडेल पैशांचा पाऊस, तुमचं भविष्य काय?
राजू उंबरकर म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची युती-आघाडी करायची नाही, असा निर्णय मनसेनं घेतला आहे. मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. या निर्णयामुळे पक्षाची राजकीय स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. राज ठाकरेंनी विदर्भाच्या पूर्व आणि पश्चिम विभागात विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मजबूत उमेदवार उभे केले जातील, असंही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकतो की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यावर असताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत महायुती सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. त्यांनी सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तसच महाराष्ट्रातील विविध समस्यांवर आणि प्रशासनाच्या निर्णयांवर ठाकरेंनी भाष्य केलं. राज ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या, विकासकामांमध्ये असणाऱ्या अडचणी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधलं. सरकारच्या धोरणांमुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांकडे लक्ष वेधत, तात्काळ सुधारणा करण्याची गरज असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यांनी महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी लोकांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
हे ही वाचा >> Anand Dighe : अपघात की घातपात? आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला?
ADVERTISEMENT