MOTN : शाह, गडकरी की योगी… मोदींचा उत्तम उत्तराधिकारी कोण? लोक म्हणतात…
Mood of the nation News in marathi : Lok Sabha elections are to be held next year. The BJP is calling it a contest between Modi versus the opposition. But the question is what will happen after Narendra Modi completes 75 years.
ADVERTISEMENT
- Mood Of The Nation : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा साडेनऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, त्यांचे वय आता 72 वर्षे आहे. दुसरीकडे, भाजपशी संबंधित नेत्यांनी अनेकदा म्हटले आहे की, 75 वर्षांनंतर भाजपमध्ये कुणीही निवडणूक लढवत नाही आणि तो मार्गदर्शक मंडळात जातात.
इतकंच नाही, तर नरेंद्र मोदींनंतर कोण असा प्रश्नही सातत्याने डोकं वर काढत असतो. याबद्दलच इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेक्षणात एक प्रश्न विचारण्यात आला. ज्यात मोदींचा उत्तराधिकारी म्हणून कोण असा प्रश्न विचारला गेला. त्यात लोकांनी काही नेत्यांची नावं सांगितली.
ADVERTISEMENT
मोदींचा उत्तराधिकारी कोण?
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजप याला मोदी विरुद्ध विरोधक यांच्यातील लढाई म्हणत आहे. पण नरेंद्र मोदींना 75 वर्षे पूर्ण झाल्यावर काय होणार हा प्रश्न आहे. आज ज्या चेहऱ्यावर भाजप प्रत्येक निवडणूक लढतो आणि जनतेकडे मते मागते, पण मग काही वर्षांनी हा चेहरा बदलेला का? असा प्रश्न उपस्थित होतो.
हेही वाचा >> ‘पहाटेच्या शपथविधीनंतरच ठरलेलं की…’, शरद पवारांचं खळबळ उडवून देणारं विधान!
असेच काही प्रश्न घेऊन इंडिया टुडेने लोकांमध्ये जाऊन विचारले की नरेंद्र मोदींचा उत्तम उत्तराधिकारी कोण असेल?
हे वाचलं का?
लोकांसमोर ठेवले होते 3 पर्याय
या सर्वेक्षणात या प्रश्नावर तीन पर्याय दिले गेले होते. यात अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी. तर 29 टक्के जनतेने अमित शाह यांना नरेंद्र मोदींचे सर्वोत्तम उत्तराधिकारी म्हटले आहे. तर 26 टक्के जनतेने योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतले. मोदींचे उत्तराधिकारी म्हणून नितीन गडकरींना 15 टक्के लोकांनी पसंती दिली.
हेही वाचा >> Sharad Pawar : ‘अजित पवारांना पुन्हा संधी नाही’, पवारांनी भूमिका केली क्लिअर
अमित शाह > 29%
ADVERTISEMENT
योगी आदित्यनाथ > 26%
ADVERTISEMENT
नितीन गडकरी > 15%
यापैकी कुणीही नाही > 70%
आता या सर्वेक्षणाबद्दल सांगायचं झालं, तर इंडिया टुडे सी-व्होटरचे सर्वेक्षण आहे जे 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान देशातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आले होते. यामध्ये 25,951 जणांनी आपले मत मांडले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT