MP Election: भाजपचं ‘बंगाल पॅटर्न’! केंद्रीय मंत्री, खासदारांना का दिली विधानसभेची तिकीटं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Assembly tickets to 7 MPs including three Union Ministers... Political messages from BJP's second list in MP
Assembly tickets to 7 MPs including three Union Ministers... Political messages from BJP's second list in MP
social share
google news

MP election 2023 Explained in marathi : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्य प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची जाहीर केली. यामध्ये 39 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपच्या या यादीत तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांचीही नावे आहेत. भाजपने नरसिंगपूरमधून प्रल्हाद सिंग पटेल यांना त्यांचे भाऊ जलम सिंग पटेल यांच्या जागी तिकीट दिले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-१ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. पण, भाजपचं हे धक्कातंत्र काय आणि मध्य प्रदेशात बंगाल पॅटर्न नेमका काय, हेच समजून घ्या.

ADVERTISEMENT

राज्याच्या निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री आणि खासदारांना उतरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. भाजपने यापूर्वी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होता. 2022 मध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना करहल मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या विरोधात उभे केले होते. बघेल निवडणूक हरले, पण त्यांनी अखिलेश यांना तगडे आव्हान दिले होते.

त्रिपुरामध्ये केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनीही विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. बघेल आणि भौमिक यांनी केंद्रात त्यांची मंत्रीपदे कायम ठेवली आहेत.

हे वाचलं का?

पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजपने बाबुल सुप्रियो यांच्यासह खासदार लॉकेट चॅटर्जी आणि निशीथ प्रामाणिक यांच्यासह पाच खासदारांना उमेदवारी दिली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, लॉकेट चटर्जी आणि राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचा पराभव झाला होता.

हेही वाचा >> राज ठाकरे भडकले, ‘मूठभर व्यापाऱ्यांनी…’

निशीथ प्रामाणिक यांना 57 मतांच्या फरकाने विजय मिळाला आणि जगन्नाथ सरकार यांचाही पराभव झाला. भाजपच्या तीन तगड्या उमेदवारांनी त्यांच्या जागाही जिंकल्या नाही, परंतु जवळपासच्या अनेक जागांवर पक्षाच्या विजयाचे श्रेय त्यांना देण्यात आले.

ADVERTISEMENT

भाजपच्या जागांमध्ये प्रचंड वाढ झाली. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकांचा पक्ष म्हणून भाजप उदयास आला. मात्र, बाबुल सुप्रियो यांना मंत्रिपद गमवावे लागल्याने त्यांच्या जागेवरील पराभवाचा फटका त्यांना सहन करावा लागला. निशीथ प्रामाणिक यांना त्यांच्या विजयाचे बक्षीस मिळाले आणि ते मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. आता भाजपने नरेंद्रसिंग तोमर, प्रल्हाद पटेल आणि फग्गनसिंग कुलस्ते यांना मध्य प्रदेशच्या लढाईत उतरवले आहे, याकडे या नेत्यांची लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.

नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल आणि फग्गनसिंग कुलस्ते यांचं केंद्रीय राजकारणातील अस्तित्व, मोदी मंत्रिमंडळातील स्थान आणि 2024 च्या निवडणुकीचे तिकीट या निवडणुकीत पणाला लागले असल्याचेही बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्र्यांच्या राजकारणाचे भवितव्य काय असेल? 2023 च्या निवडणुकीचे निकालही या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत. ते निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय दरी ओलांडण्यात यशस्वी झाले, तर पुढचा मार्ग सुकर असेल आणि डुबले तर राजकारणाला ग्रहण लागेल.

एका सीटवर नजर, अनेक जागांवर टार्गेट

2018 च्या निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन भाजप 2023 साठी रणनीती आखण्यात व्यस्त आहे. ग्वाल्हेर भागात काँग्रेसचा वरचष्मा होता आणि इंदूरमध्येही भाजपचे गणित चुकले होते. ग्वाल्हेरमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, पण पक्ष कोणताही हलगर्जीपणा खपवून घेण्याच्या मनस्थितीत नाही.

नरेंद्र सिंह तोमर यांची ग्वाल्हेर विभागातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना केली जाते. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा ग्वाल्हेर तसेच गुना आणि मुरैना येथे चांगला प्रभाव आहे. त्याचवेळी, कैलाश विजयवर्गीय इंदूर, गणेश सिंह सतना, राकेश सिंग जबलपूर, उदयप्रताप सिंग होशंगाबाद, रीती पाठक हे सिधी भागातील प्रभावशाली नेते आहेत.

हे नेते ज्या जागांवर निवडणूक लढवत आहेत, त्या मतदारसंघावरच नव्हे तर जवळपासच्या अनेक जागांवरील निकालांवरही प्रभाव टाकून पक्षाच्या जागा वाढवू शकतात.

सामूहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला की शिवराज चौहानांचा वेढा

केंद्रीय मंत्री आणि खासदारांना तिकीट देण्यामागे सामूहिक नेतृत्वाच्या सूत्राला धार देण्याची भाजपची रणनीती हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कोणत्याही एका नेत्याचे नाव घेण्याचे भाजप टाळत असून सामूहिक नेतृत्वाच्या सूत्रावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

 हेही वाचा >> लोकसभा 2024 निवडणुकीपूर्वीच BJP ला दक्षिणेत झटका! AIADMK ची मोठी घोषणा

नरेंद्र सिंह तोमर आणि कैलाश विजयवर्गीय यांच्यासारख्या चेहऱ्यांची उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भोपाळमध्ये होते.

भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी सीएम शिवराज यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेंस आता अधिकच गडद झाला आहे.

नरेंद्र सिंह तोमर आणि कैलाश विजयवर्गीय हे दोघेही भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात. गेल्या निवडणुकीत आकाश विजयवर्गीय यांना भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांना निवडणूक लढवता आली नाही.

त्यावेळी शिवराज यांचा ‘एक परिवार, एक तिकीट’ हा फॉर्म्युला त्यासाठी जबाबदार मानला गेला. यावेळी विजयवर्गीय आणि नरेंद्रसिंह तोमर यांना तिकीट देऊन भाजपने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान म्हणजे भाजप नाही, असा संदेश दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT