Anil Deshmukh : शरद पवारांनी 'तो' इशारा दिला होता, हिंसाचाराच्या घटनेवर अनिल देशमुख काय म्हणाले?
Anil Deshmukh On Nashik Violence : नाशिकच्या हिंसाचाराच्या घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसच या हिंसाचाराच्या प्रकरणात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नाशिकच्या घटनेबाबत अनिल देशमुखांचं मोठं विधान
"राज्यात होणारे दंगे सरकार पुरस्कृत", विजय वडेट्टीवारांचाही हल्लाबोल
कायदा-सुव्यवस्थेकडे गृहखात्याने लक्ष देण्याची देशमुखांची मागणी
Anil Deshmukh On Nashik Violence : नाशिकच्या हिंसाचाराच्या घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसच या हिंसाचाराच्या प्रकरणात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आले आहेत. याप्रकरणी १२ ते १५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी दिलीय. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दंगली होऊ शकतात, असा इशारा शरद पवारांनी आधीच दिला होता. पवारांनी म्हटलं होतं तसं राज्यात होताना दिसत आहे, असं मोठं विधान देशमुखांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
अनिल देशमुख काय म्हणाले?
दंगली होऊ शकतात, असा इशारा शरद पवारांनी आधीच दिला होता. पवारांनी म्हटलं होतं तसं राज्यात होताना दिसत आहे. नाशिक, संभाजीनगरमध्ये तणाव आहे. दंगलीचा कट रचला जातोय का? कायदा आणि सुव्यवस्थेकडे गृहखात्याने लक्ष द्यावं. सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळं केव्हाही दंगली घडू शकतात. नाशिक, संभाजीनगर आणि इतर शहरात पाहिलं, तर तशाच पद्धतीच्या दंगली घडवण्याचा कट कारस्थान आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्रात सलोख्याचं आणि शांत वातावरण राहायला पाहिजे. ही गृहखात्याची प्राथमिक गरज आहे. याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे.
हे ही वाचा >> Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे
"राज्यात होणारे दंगे सरकार पुरस्कृत", विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
काल नाशिकमध्ये जे झालं, ते सरकार पुरस्कृत आहे. कालच्या मोर्चामुळं उद्धवलेली परिस्थिती आहे, त्यात आशिष शेलार म्हणतात की सोलून काढा. तू राजकारणी आहेस की गुंडा आहेस, सोलून काढायची भाषा वापरता. कुणी कुणावर दगड फेकायची, उच्चस्तरीय चौकशी होऊद्या. कुणाच्या भावना प्रगट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु, सक्तीनं कुणी बंद करून दगडफेक करत असतील, तर कारवाई होणे अपेक्षित आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Ajit Pawar : अजित पवारांना मराठा आंदोलकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
बांगलादेशमधील हिंदूंच्या मुद्द्यावरून सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी नाशिकमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंदमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दुकाने बंद करण्यावरून दोन गट आमनेसामने भिडल्याने दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळाकांड्याही फोडाव्या लागल्या. यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याचंही समजते. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT