रात्रीच्या अंधारात फक्त अर्ध्या तासात केलं ऑपरेशन... 9 टार्गेट कसे उडवले? कर्नल सोफिया यांनी सविस्तर सांगितलं
कर्नल सोफिया कुरैशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या नेतृत्वात झालेल्या या पत्रकार परिषदेत ही संपूर्ण माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद

कर्नल सोफिया कुरैशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली सविस्तर माहिती

पाकला घुसून मारलं, 9 ठिकाणांची सविस्तर माहिती दिली...
Operation Sindoor Press Conference : पाकिस्तानमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरात सध्या या हल्ल्याची चर्चा सुरू आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संताप होता. गेल्या 15 दिवसांपासून लोक त्याच संतापात पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची मागणी करत होते. अखेर काल रात्री दीड वाजता भारताने पाकच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. याची अधिकृत माहिती आज संरक्षण दलांच्या अधिकृत पत्रकार परिषदेत दिली आहे.
हे ही वाचा >> भारताने या ऑपरेशनला 'सिंदूर' असं नाव का दिलं? त्यामागचा अर्थ काय?
कर्नल सोफिया कुरैशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या नेतृत्वात झालेल्या या पत्रकार परिषदेत ही संपूर्ण माहिती दिली. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतात संताप होता. 22 एप्रिलच्या हल्ल्यातील आरोपींवर पाकिस्ताननं कोणतीही कारवाई केली नाही. अत्यंत जबाबदारीनं दहशतवाद्यांच्या इन्फ्रावर ही कारवाई केली. एअर स्ट्राईक करुन भारताने आपल्या अधिकारांचा वापर केलाय. प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून षडयंत्र रचणाऱ्या, बॅक अप देणाऱ्यांची अचूक माहिती तपास यंत्रणांनी घेतली होती. यातून पहलगाम हल्ल्याचे पाक कनेक्शन उघड झाले. तसंच TRF ने हल्ल्याची जबाबदारी घेतली. ही संघटनाही लष्कर ए तोयबाशी संबंधीत आहे.
1 वाजून 5 मिनिटपासून ते दीडपर्यंत काय घडलं?
पहलगाम हल्ल्याला उत्तर आणि मृतांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन केलं असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं. या हल्ल्यात 9 दहशतवादी तळांना उध्वस्त केलं असं त्यांनी सांगितलं. जे ठिकाणं उध्वस्त केले, तिथे दहशतवाद्यांचे लाँचपॅड होते. इंटेलिजन्स यंत्रणांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारावर हे टार्गेट शोधले. पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये या हेतून जबाबदारीनं ते निवडले.
पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधली ठिकाणं...
- सवाई नाला, POJK : सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम हल्ल्याला इथूनच अतिरेकी आले.
- सईदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद : जैश च्या हत्यार, विस्फोटक आणि जंगल सर्वायवल ट्रेनिंग कॅम्प.
- कोटली : LOC पासून 30 किमी दूर. पूंछ आणि तीर्थयात्रींवर झालेल्या बस हल्ल्याला इथूनच तयारी केली होती.
- बर्नाला कॅम्प, भिमबर : LOC पासून 9 किमी दूर असलेलं हे ठिकाण आहे. इथे हत्यारं, IED, जंगल सर्व्हायवल कॅम्प आहे.
- अब्बास कॅम्प, कोटली : LOC पासून 13 किमी दूर. 15 दहशतवाद्यांना ट्रेन करण्याची क्षमता या कॅम्पची होती.
पाकिस्तानच्या आतले कॅम्प....
- सर्जाल कॅम्प : आंतरराष्ट्रीय सिमेपासून 6 किमी दूर असलेलं ही ठिकाण आहे. मार्च 2025 मध्ये जम्मू काश्मीरच्या चार पोलिसांची हत्या केली होती. त्या अतिरेक्यांना इथेच ट्रेन केलं होतं.
- मेहमुना जाया कॅम्प, सियालकोट : आंतरराष्ट्रीय सिमेपासून 18 ते 12 दूर असलेला हिजबूलचा हा कॅम्प होता. पठाणकोट एअऱ बेसवरचा हल्ला इथेच प्लॅन झाला होता.
- मरकझ तायबा, मुरीदके : आंतरराष्ट्रीय सिमेपासून पासून 18 ते 25 किमी दूर असलेलं हे ठिकाण आहे. 2008 मुंबई हल्ल्याला अजमल कसाब, डेविड हेडली इथे ट्रेन झाले होते.
- मरकझ सुभान अल्लाह : हा जैश-ए- मोहम्मदचं मोठा कॅम्प आहे. दहशतवादी इथे नेहमी यायचे. नागरिकांना आम्ही निशाणा केलं नव्हतं.