Opposition unity : UPA होणार नामशेष! भाजपविरोधात काय आहे रणनीती?
18 जुलै रोजी दुपारी 4 वाजता बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. 18 तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाने सभेला सुरुवात होणार आहे.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 18 जुलै रोजी बंगळुरूमध्ये विरोधकांची ‘महाबैठक’ आयोजित करण्यात आलीये. या बैठकीत काँग्रेससह 24 पक्ष सहभागी होत आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आम आदमी पार्टी (AAP) या भाजपविरोधी पक्षांच्या नव्या आघाडीला यापुढे संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) म्हटले जाणार नाही. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीत नवीन नावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. (Ahead of next year’s Lok Sabha elections, a ‘Maha Baithak’ of the opposition is being held in Bengaluru today.)
तेव्हा सोनिया गांधी होत्या अध्यक्षा
यूपीए 2004 ते 2014 पर्यंत दोन टर्म केंद्रात सत्तेवर होती आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित भाजप विरोधी गटाचा एक समान किमान कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. त्याचबरोबर विरोधकांच्या बैठकीत राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा केली जाणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या आघाडीकडून समान किमान कार्यक्रम आणि चर्चेचे मुद्दे तयार करण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नव्या नावाबद्दल जयराम रमेश काय बोलले?
बैठकीबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, ’26 पक्ष आहेत. आम्ही विविध मुद्द्यांवर एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यातील सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. आम्ही ते सर्व सोडवू.’