Pankaja Munde : ‘दारू प्यायची तर प्या, पण…’; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना काय दिला सल्ला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pankaja munde liquor statement advice party worker blood donation camp gopinath munde birth anniversary jayanti beed news
pankaja munde liquor statement advice party worker blood donation camp gopinath munde birth anniversary jayanti beed news
social share
google news

Pankaja Munde liquor Statement : योगेश काशीद, बीड : ‘दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका’. ‘पिण्याला मी नाही म्हणत नाही, पण त्याने विष बाधा होते’,असा मोलाचा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. गोपिनाथ मुंडे यांची मंगळवारी जयंती होती. या जयंतीनिमित्त बीडमध्ये (Beed) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त कार्यकर्त्याशी संवाद साधताना हा मोलाचा सल्ला दिला होता. (pankaja munde liquor statement advice party worker blood donation camp gopinath munde birth anniversary jayanti beed news)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

बीडमध्ये गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान करताना पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी बोलत होत्या.’दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, त्याने विष बाधा होते’, ‘पिण्याला मी नाही म्हणत नाही,असा मोलाचा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. ती तंबाखू खाणारी कोण पोर आहेत, तंबाखू खाणे बंद करा. वास येतो त्याचा, कॅन्सर होतो. तंबाखू खाऊन कुठेही थुंकू नका. तसेच चांगलं चांगलं खा मास मच्छी व्हेजिटेरियन खा आणि हेल्दी रहा असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

हे ही वाचा : Video : रिंकू सिंहची वादळी खेळी, मीडिया बॉक्सची फोडली काच

पंकजाताई आणि मी मिळून बीडचा विकास करू

दरम्यान काही दिवसांपूर्वीच बीडच्या परळीत महायुती सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला होता.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी व्यासपीठावरून बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा ताईंनी विकासाची सूरूवात केली, आता विकासाचा मध्यावर आपण आहोत. आणि आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीने इतकचं सांगतो की, आम्ही (मी आणि पंकजा) दोघं मिळून बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू, माझी इतकी इच्छा असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Bhajanlal Sharma : भाजपला का हवा होता ब्राह्मण चेहरा? मुख्यमंत्री निवडीची Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT