No Confidence Motion : सर्व रेकॉर्ड मोडून 2024 मध्ये परत येऊ; PM मोदींचा पलटवार
PM Modi Specch on No Confidence Motion : काँग्रेसचे गौरव गोगेईंनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरले. त्याला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी विरोधकांना कोपरखळ्या लगावल्या. अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदींचं उत्तर – देशातील जनतेने आमच्या सरकारवर वारंवार विश्वास व्यक्त केला आहे. – ईश्वर खूप दयाळू असतात, […]
ADVERTISEMENT

PM Modi Specch on No Confidence Motion : काँग्रेसचे गौरव गोगेईंनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरले. त्याला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी विरोधकांना कोपरखळ्या लगावल्या.
अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदींचं उत्तर
– देशातील जनतेने आमच्या सरकारवर वारंवार विश्वास व्यक्त केला आहे.
– ईश्वर खूप दयाळू असतात, असे म्हणतात. ईश्वर कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करत असतो. मी याला (अविश्वास ठराव) ईश्वराचा आशीर्वाद मानतो. ईश्वराने विरोधकांना सुचवलं आणि ते अविश्वास प्रस्ताव घेऊन आले. 2018 मध्येही ईश्वराचाच आदेश होता.
-त्यावेळी मी म्हणालो होतो की, अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची बहुमत चाचणी नाहीये. उलट ही त्यांची परीक्ष आहे. झालंही तसंच. मतदान झालं तेव्हा विरोधकांकडे जितकी मतं होती, तितकीही त्यांना गोळा करता आली नाही. आम्ही जनतेत गेलो, तेव्हा जनतेही यांच्यावर अविश्वास दाखवला. निवडणुकीत एनडीए आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. एकप्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो.