Prakash Ambedkar : 'मविआ'ला आंबेडकर देणार झटका; भुजबळांना दिली ऑफर

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर यांनी नव्या ओबीसी पक्षाचे नेतृत्व करण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला आहे.
prakash ambedkar express displeasure after meeting between uddhav Thackeray And congress leaders
social share
google news

Prakash Ambedkar Chhagan Bhujbal : उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीबद्दल नाराजी व्यक्त करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या नव्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. भुजबळांनी नव्या पक्ष संघटनेचं नेतृत्व करावं, वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून त्यांना सामाजिक आणि राजकीय मदत करायला तयार आहोत, अशी ऑफर आंबेडकरांनी भुजबळांना दिली. (Prakash Ambedkar, chief of vanchit bahujan aghadi is looking for new options outside Maha Vikas Aghadi for lok Sabha 2024 election)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडी सुरू आहेत. आघाडी आणि महायुती स्वतःला बेरजेचं राजकारण करताना दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे तिन्ही पक्ष आहेत. त्यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरूच असल्याने गेल्या काही दिवसांपासून आंबेडकर नाराज असल्याचे दिसत आहे. 

ठाकरे-काँग्रेस नेत्यांची बैठक

लवकर जागावाटप निश्चित करा, असं आवाहन केलं जात असतानाच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मविआतील इतर पक्षाचे कुणीही नव्हते. त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्ती केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वंचित म्हटलंय की, "काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागावाटप, तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित नव्हते."

"देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझोता केलेला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे", असे सांगत बैठकीपासून दूर ठेवल्याची नाराजी वंचित बहुजन आघाडीने बोलून दाखवली.

ADVERTISEMENT

"वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना या बैठकीपासून 'वंचित' का ठेवलं ?" असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे. दरम्यान, "काँग्रेसने २४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी २३ जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून, ही बाब खरी आहे का?" असा प्रश्नही वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे.

ADVERTISEMENT

भुजबळांना ऑफर 

महाविकास आघाडीत सामील होण्यास इच्छुक असलेल्या प्रकाश आंबेडकरांकडून आणखी एक भूमिका मांडण्यात आली आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळे ते नवा पर्याय शोधत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ते काय म्हणालेत ते वाचा...

"ओबीसी नेत्याने राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली. या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढताहेत ही फार चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की, आपण या ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावं. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक, राजकीय आम्ही त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो", असे आंबेडकरांनी म्हटले आहे. त्यामुळे आंबेडकरांनी नवा पर्याय उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT