Prataprao Jadhav : ''आम्ही तीन पिढ्या वीज भरलं नाही'', शिंदेंचा मंत्री 'हे' काय बोलून गेला?
Prataprao Jadhav Big Statement : ''मी शेतकरी आहे. माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही, माझ्या आजोबांनी पण नाही, माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी देखील वीज बिल भरलेले नाही. किंबहुना विजेची डी.पी. जळाली तर संबंधित इंजिनियरला एक हजार रुपये दिले की झालं काम'' असा प्रसंग मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही
प्रतापराव जाधव यांच्या विधानानंतर पेटला वाद
प्रतापराव जाधव यांचे विधानावर स्पष्टीकरण
Prataprao Jadhav Big Statement : ''मी शेतकरी आहे. माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही. माझ्या आजोबांनी पण नाही, माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी देखील वीज बिल भरलेले नाही. आणि विजेचा डी.पी जळाली तर इंजिनियरला एक हजार रूपये दिले की झालं काम'', असे विधान शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataproa Jadhav) यांनी एका कार्यक्रमात केले होते. जाधव यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे. तसेच नेटकऱ्यांनी जाधवांवर टीका करायला सुरूवात केली आहे. (prataprao jadhav big statement we have not paid electricity for three generations eknath shinde shiv sena mp netizens angry)
ADVERTISEMENT
बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे शनिवारी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून बोलताना ''मी शेतकरी आहे. माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही, माझ्या आजोबांनी पण नाही, माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी देखील वीज बिल भरलेले नाही. किंबहुना विजेची डी.पी. जळाली तर संबंधित इंजिनियरला एक हजार रुपये दिले की झालं काम'' असा प्रसंग मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितला होता. आमच्या राज्य सरकारने आता शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं आहे, हे शेतकऱ्यांना पटवून देताना जाधव यांनी हे विधान केले.
हे ही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेची रक्कम वाढणार, फक्त...
तसेच जसं दोन सम विचारी बैल शेतीत जुंपले की शेती चांगली होते, तस सरकारच आहे. केंद्र आणि राज्य सरकार समविचारी असले की विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रत्येक खासदारांवर, प्रत्येक खात्यांवर बारीक लक्ष असतं. असेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. असे असताना मात्र, मी मंत्री झाल्यावर आमचा सामान्य माणसाशी संपर्क कमी होतो आहे, याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली होती.
हे वाचलं का?
प्रतापराव जाधव यांच्या या विधानानंतर मोठा वाद पेटला आहे. अनेकांनी यावर महावितरण काय झोपा काढतंय का? असा सवाल उपस्थित केला. तर एका नेटकऱ्याने ''प्रतापराव जाधव यांना वाटतंय की तीन पिढ्या वीज बिल न भरून शेती चालवणं अगदी सोपंय. पण सामान्य माणसाला एक महिन्याचं बिल थकलं की महावितरण लगेच वीज कापतं. असल्या राजकीय मंडळींचं काय, त्यांच्याकडे लाखोंची थकबाकी असली तरी महावितरणचं काही चालत नाही!'', अशी टीका केली आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बँक खात्यात 4500 जमाच झाले नाही! महिलांनो, कुठे कराल तक्रार?
प्रतापराव जाधवांची सारवासारव
दरम्यान या विधानानंतर प्रतापराव जाधव यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ''मी राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने शेतीचे वीजबिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांच्या भाषेत सांगत होतो. मात्र माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आणि मीच वीज बिल भरले नाही असं सांगितलं. मी स्वतः कधीच वीज बिल बुडवले नसून माझ्या सर्व शेतीच वीज बिल मी मार्च महिन्यात भरत असतो. वाटल्यास मी तुम्हाला नो ड्युज प्रमाणपत्र देऊ शकतो. अशी स्पष्टोक्ती प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT