अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांना बाल्लेकिल्ल्यातच धक्का!
भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या परिवर्तन पॅनलने विखे-पाटील पितापुत्रांच्या गटाचा धुव्वा उडवला.
ADVERTISEMENT
Maharashtra politics latest news : राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना बाल्लेकिल्ल्यातच झटका बसला आहे. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या परिवर्तन पॅनलने विखे-पाटील पितापुत्रांच्या गटाचा धुव्वा उडवला.
ADVERTISEMENT
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (19 जून) लागला. या निवडणुकीत कोल्हे-थोरात यांच्या परिवर्तन पॅनलने 19 पैकी तब्बल 18 जागा जिंकत विजयाचा गुलाल उधळला. राहाता तालुका विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातच येतो, पण या निवडणुकीत विखे पाटील यांच्या गटाला सोसायटी मतदारसंघातील एक जागा जिंकता आली.
Video >> गणेश सहकारी साखर कारखाना जिंकल्यानंतर निलेश लंके यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना चॅलेंज
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना 2014 पासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याकडे करार तत्त्वाने चालवण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील हेच कारखान्याचे कारभार बघत होते. सत्ताधारी पॅनलच पराभूत झाल्याने हा विखे पाटील यांना धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
हे वाचलं का?
जिरवाजिरवीचे राजकारण बंद करा -बाळासाहेब थोरात
गणेश सहकारी कारखाना निवडणुकीत परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. “समृद्धीचा इतिहास राहिलेल्या राहाता तालुक्याला तुम्हाला पूर्वीचे वैभव का मिळवून देता आले नाही? जिरवाजिरवीचे राजकारण बंद करा. या निवडणुकीतून दडपशाहीचे झाकण उडवले असून, दडपशाहीतून या परिसराला स्वातंत्र्य मिळाले आहे”, असं थोरात म्हणाले.
नीलेश लंकेंचा इशारा, सुजय विखेंचं पार्सल परत पाठवणार
या निकालानंतर बोलताना आमदार नीलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे-पाटलांवर हल्ला चढवला. “ये तो एक झाकी है, पिक्चर अभी बाकी है. खऱ्या अर्थाने राहात्यातील जनतेने दहशतवादाला मूठमाती दिलीये. ही परिवर्तनाची सुरू झाली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पार्सलही परत पाठवणार आहे”, असं म्हणत लंकेशी थेट सुजय विखे-पाटलांना आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक : कोण कोण जिंकले?
1) अनिल गाढवे
2) संपत चौधरी
3) अनिल टिळेकर
4) मधुकर सातव
5) अलेश कापसे
6) शोभाबाई गोंदकर
7) कमलाबाई धनवटे
8) बाबासाहेब डांगे
9) विजय दंडवते
10) नारायण कार्ले
11) गंगाधर डांगे
12) संपत हिंगे
13) महेंद्र गोर्डे
14) बाळासाहेब चोळके
15) नानासाहेब नळे
16) अरुधंती फोपसे
17) सुधीर लहारे
18) विष्णुपंत शेळके
19) ज्ञानदेव चोळके
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT