Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी गेली, काँग्रेसला झटका; लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई
Rahul Gandhi disqualified as mp after surat court sentence : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सूरत सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लोकसभा अध्यक्षांनी गांधींची खासदारकी रद्द केली. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT

Rahul Gandhi disqualified from membership of lok sabha : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी राहणार की जाणार, याची चर्चा सुरू झाली होती. न्यायालयाच्या निकालानंतर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Rahul Gandhi disqualified from lok sabha membership)
या कारवाईनंतर काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टीका केली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली.
मोदी आडनाव बदनामी प्रकरण : राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधींना ज्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली, ते 2019 मधील आहे. राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकात प्रचारसभेत मोदी आडनावावरून टीका केली होती.
कर्नाटकातील प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले होते की, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचं नाव मोदी का असतं?