Ram Mandir Live: अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा… पण उद्धव ठाकरे, राहुल गांधीसह विरोधकांचा काय प्रोगाम?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Ram Mandir Inauguration then What is Today's plan of opposition Party leaders mamata banerjee rahul gandhi uddhav thackeray
Ram Mandir Inauguration then What is Today's plan of opposition Party leaders mamata banerjee rahul gandhi uddhav thackeray
social share
google news

Ram Mandir Inaugration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा ( ram mandir pran pratishtha) सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. पाचशे वर्षांची प्रतिक्षा आता संपेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राम मंदिरात दुपारी 12:05 ते 12:55 या वेळेत हा राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. (Ram Mandir Inauguration then What is Today’s plan of opposition Party leaders mamata banerjee rahul gandhi uddhav thackeray)

ADVERTISEMENT

या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पार्टी (SP) प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा (BJP) हा राजकीय कार्यक्रम म्हणत विरोधी पक्षनेत्यांनी या कार्यक्रमापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

वाचा : Ayodhya Ram Mandir Live: फक्त 84 सेंकद… अशी होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, एक क्लिकवर सगळा कार्यक्रम!

राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे आज काही स्वतःचे खास प्लॅन आहेत. राहुल गांधी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेला निघाले आहेत. त्यांचा हा दौरा आसाममध्ये आहे. त्यानिमित्ताने आज राहुल गांधी आसाममधील नगाव जिल्ह्यातील वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान असलेल्या बोर्डोवा थान येथे भेट देतील.

हे वाचलं का?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना बोर्डोवा थान न जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी सांगितले की, राहुल गांधी वेळापत्रकानुसार बोर्डोवा थान जातील.

वाचा : Ram Mandir : अशोक चव्हाण यांच्या मनात काय? नांदेडमध्ये झळकले राम प्राण प्रतिष्ठा बॅनर्स

ममता बॅनर्जी कालीघाट मंदिरात घेणार दर्शन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला जाणं टाळलं. टीएमसीने भाजपवर धार्मिक कार्यक्रमाला राजकीय कार्यक्रमात रुपांतरित केल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात पोहोचून दर्शन आणि पूजा करणार आहेत. कालीघाट मंदिरात दर्शन आणि पूजा केल्यानंतर ममता बॅनर्जी सर्व धर्म सद्भावना रॅलीही काढणार आहेत.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिराला देणार भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही राम मंदिर कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. आज उद्धव ठाकरे विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमी भगूरला भेट देणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे सायंकाळी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात पोहोचून महाआरतीत सहभागी होतील.

ADVERTISEMENT

वाचा : “यात उद्धवजींचा काही दोष नाही”, चित्रा वाघ यांनी राऊतांकडे मागितला पुरावा

आम आदमी पक्षाची (AAP) निघणार शोभा यात्रा

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (AAP) अयोध्येच्या राम मंदिरात राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या या प्रसंगी शोभा यात्रा काढणार आहे. या मिरवणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील सहभागी होऊ शकतात. आम आदमी पक्षातर्फे संपूर्ण दिल्लीत भंडाराही आयोजित केला जाणार आहे. 20 जानेवारीपासूनच प्यारेलाल भवनमध्ये आम आदमी पक्षाकडून रामलीलेचे आयोजन करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT