Supriya Sule : ‘आत्मविश्वास गमावलेल्या…’, रुपाली चाकणकरांनी ट्विट करत सुप्रियाताईंना डिवचले

मुंबई तक

ADVERTISEMENT

rupali chakankar tweeted supriya sule lost confidence irrigation scam bank fraud
rupali chakankar tweeted supriya sule lost confidence irrigation scam bank fraud
social share
google news

Rupali Chakankar : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल संसदेत भाषण करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आरोपावरून त्यांना थेट आव्हानचे दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर (National Congress Party) भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) आणि राज्य सहकाराच्या बॅंकेच्या घोटाळ्याची चौकशी तुम्ही कराच. ती चौकशी करताना मी तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे असं वक्तव्यही त्यांनी संसदेत केलं होतं. त्यांच्या त्या मागणीनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (rupali chakankar tweeted supriya sule lost confidence irrigation scam bank fraud)

शिळ्या कडीला ऊत

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही चौकशी लावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. त्यावर आता रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता तयांच्यावर निशाणा साधला आहे. हे म्हणत असताना त्यांनी हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> नव्या संसदेत पहिलेच भाषण, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नवीन संकल्प….’

‘हे’ बघून आश्चर्य वाटतं

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी बघून आश्चर्य वाटतं आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये राजकीय युद्ध रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘…तरीही निवडणूक आयोगाने ‘तो’ निर्णय घेतला’, जयंत पाटलांचं मोठं विधान

उमाळा दाटून येणारी व्यक्ती

रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता अजित पवारांवरून त्यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या अजितदादांचे काही फोटो बघून भावूक झाल्याचे दिसतात. त्या व्हिडीओवरूनच बरं आम्ही कोणाला खरं समजायचं?? कुणाच्या आठवणीने उमाळा दाटून येणारी व्यक्ती खरी की त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी? असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT