Sanjay Raut : ‘हा सगळा गांडू बगीचा’, राऊतांचा चढला पारा, शेलारांवरच भडकले

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sanjay Raut hits out at Ashish shelar over corruption charges on mva leaders.
Sanjay Raut hits out at Ashish shelar over corruption charges on mva leaders.
social share
google news

Sanjay Raut On Bjp Politics : आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्या टीकेवरून संजय राऊत शेलार आणि भाजपवर चांगलेच संतापलेले दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केलेल्या अजित पवारांपासून ते एकनाथ शिंदे… भाजपने आरोप केलेल्या सगळ्या नेत्यांची नावे घेत संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं. तुमच्या पॅन्टचा नाडा बांधायला इक्बाल मिर्ची येणार आहे का? असा सवाल करत राऊत शेलारांवर कडाडले.

ADVERTISEMENT

आशिष शेलारांनी सोनिया गांधी आणि लालू प्रसाद यादव यांचं नाव घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यासंदर्भात प्रश्न विचारताच संजय राऊत संतापले. राऊत म्हणाले, “कोण आशिष शेलार? अजित पवारांवर बोलता का म्हणावं. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप हे नरेंद्र मोदी करतात. चारा घोटाळा कसला? हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी तुम्ही का बोलत नाही?”, असा उलट सवाल राऊतांनी आशिष शेलारांना केला.

हे ही वाचा >> Kirtikar vs Kadam : CM शिंदेंनी कीर्तिकरांना काय दिली होती ऑफर? रामदास कदमांनी सांगून टाकलं

“माझं आशिष शेलार यांना नम्र आवाहन आहे की, आधी तुमची पँट सुटलेली आहे. लोंबतेय. नाडी सुटलेली आहे. ती काय इक्बाल मिर्ची बांधायला येणार आहे का? त्याच्यावर बोला ना तुम्ही. तुमच्या राजकीय विरोधकांच्या प्रकरणांवर बोलता, पण आमच्याकडचा सगळा घाण कचरा तुम्ही घेतलात ना तुमच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये”, असा उलट सवाल राऊतांनी शेलारांना केला.

हे वाचलं का?

मुलुंडचा नागडा पोपटलाल म्हणत सोमय्यांना डिवचलं

“तुम्ही त्या कचऱ्यात डुकरासारखे लोळता आहात. तुम्ही तो कचरा साफ करता आहात का? त्याच्यावर का बोलत नाही. हे माझं म्हणणं फक्त शेलारांनाच नाही तर भाजपच्या प्रत्येक नेत्याला माझं हे सांगणं आहे. मग तो मुलुंडचा नागडा पोपटलाल असेल किंवा अन्य कुणी असेल”, असं राऊत म्हणाले.

हे ही वाचा >> ‘उद्धव ठाकरेंनीच मला गुहागरमधून पाडलं’, कदमांनी सांगितली Inside Story

“अरे तुमच्याकडे जो कचरा आलेला आहे, त्या कचऱ्यावर बोला. तो कचरा साफ करा. जेसीबी तिकडे लावा. आमच्याकडे काय बोटं दाखवता. आम्ही समर्थ आहोत. कचरा साफ करायला, राजकारण स्वच्छ करायला आणि संघर्ष करायला. हे तुम्ही सगळे डरपोक”, असं टीकास्त्र राऊतांनी शेलार आणि भाजपवर डागलं.

ADVERTISEMENT

“महाराष्ट्रातील राजकारणाचा गांडू बगीचा”

“हे सध्याचं सरकार भाजप, एकनाथ शिंदेंचा गट आणि अजित पवारांचा गट हा या महाराष्ट्रातील राजकारणाचा गांडू बगीचा आहे. नामदेव ढसाळांचं एक पुस्तक होतं कवितेचं. गांडू बगीचा. हा सगळा गांडू बगीचा आपल्याला महाराष्ट्रात दिसतोय”, अशा शब्दात संजय राऊतांनी शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT