Maharashtra Politics: ‘धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं..’, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका
Maharashtra Politics: नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी आपल्या सहकारी पक्षातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Latest News: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या एका विचित्र कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरं तर दोन दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना जेव्हा शिवसेना (शिंदे गट) नेत्यांच्या नावाचा उल्लेख झाला होता. तेव्हा संजय राऊत हे चक्क थुंकले (to spit) होते. ज्यावरुन त्यांच्यावर तुफान टीका केली जात आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संजय राऊतांना तारतम्य बाळगावी असा सल्ला दिला होता. ज्यावर आज (3 जून) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी अजित पवारांना जहरी शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. (sanjay raut to spit shinde group ajit pawar dam criticized ncp mva)
‘बरोबर आहे की.. धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं चांगलं. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही इकडे-तिकडे पळालेलो नाहीत.’ असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं चांगलं..’
‘बरोबर आहे की.. धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं चांगलं.. संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने हे बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत. आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर आहोत. इकडे-तिकडे पळालेलो नाहीत. मी माझ्या पक्षासोबत ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, आमच्यावर संकटं येत आहेत म्हणून भाजपसारख्या पक्षासोबत सूत जुळविण्याचा आमच्या मनात विचार येत नाही.’
‘ज्यांनी ठाकरे कुटुंबीयांशी, शिवसेनेशी बेईमानी केली.. त्यांची नावं समजली तेव्हा माझी जीभ चावली गेली.. त्यातून ती रिअॅक्शन झाली. माझ्या इतकं चांगलं संतुलन कोणाचंच नाही. माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलं आहे. हे त्यांनी मान्य करावं.’ असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.