Sharad Pawar Meet Ajit Pawar: ‘सामना’चा अग्रलेख शरद पवारांच्या जिव्हारी, पत्रकारावर संतापले!
शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर ‘सामना’च्या अग्रलेखावर टीका करण्यात आली. याच मुद्द्यावरून जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र, शरद पवार हे प्रचंड संतापलेले दिसून आले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Meet Ajit Pawar: बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची शनिवारी(12 ऑगस्ट) पुण्यात एक गुप्त भेट झाली. ज्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. तसंच पुन्हा एकदा शरद पवारांबाबत संभ्रमाचं वातावरण हे महाविकास आघाडीत झालं आहे. ज्यावरुन शिवसेना (UBT) पक्षाचं मुखपत्रं असलेल्या ‘सामना’तून शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. यावरूनच जेव्हा आज (14 ऑगस्ट) शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच प्रचंड संतापले. (sharad pawar and ajit pawar secret meeting criticized on saamana editorial visibly angry latest update on maharashtra politics)
ADVERTISEMENT
अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतरही सातत्याने अजित पवार हे त्यांची भेट घेत आहेत. कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे ते शरद पवारांना भेटत आहेत. असं असल्याने महाविकास आघाडी आणि राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण होत असून शरद पवारांचं वागणं हे काही बरं नाही. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. याचबाबत जेव्हा पवारांना विचारण्यात आलं तेव्हा ते खूपच संतापले.
‘सामना’चा अग्रलेख शरद पवारांच्या जिव्हारी..
अजित पवारांनी गुप्तपणे भेट घेतल्यापासून शरद पवार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशावेळी आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘संभ्रम वैगरे काही नाही.. महाविकास आघाडीमध्ये विचाराने जे एकत्र आहेत. ज्याची भूमिका ते आज देशपातळीवर आणि राज्यामध्ये भाजपशी संबंधित जी आहे त्या घटकांशी आमचा कुठलाही सहभाग असण्याचं कारण नाही.’
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार अजित पवारांचे मनोमिलन होणार? दिले संकेत
‘ही भूमिका स्पष्ट झाल्यानंतर संभ्रम राहिलेला नाही. काल मी सोलापूरला होतो त्याही ठिकाणी मी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. पण आजच्या वर्तमानपत्रात तशा बातम्या आहेत. त्यामुळे एकदा ही गोष्ट स्पष्ट केल्यानंतर पुन्हा-पुन्हा तो प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका.’
ADVERTISEMENT
‘सामना’तील अग्रलेखावर प्रश्न विचारताच शरद पवार संतापले..
दरम्यान, याचवेळी शरद पवार यांना सामनात त्यांच्याविषयी जो अग्रलेख प्रकाशित करण्यात आला त्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, ‘त्यांनी कोणी काही लिहलंय.. तर मी सांगतो ते माझं मत आहे की त्यांचं मत आहे?’ असं म्हणत त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. तसंच या प्रश्नावर ते पुढे अधिक काहीच बोलले नाही.
ADVERTISEMENT
मणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
यांनतर पवारांना मणिपूरच्या प्रश्नाबद्दल देखील विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की, ‘देशामध्ये संसदेच्या अधिवेशनात काहीही हाती लागलेले नाही. कारण मणिपूर हे फक्त राज्य नाही तर या ठिकाणी सात अशी राज्य आहेत जी संवेदनशील आहेत. कारण त्यांच्या शेजारी मोठा देश आहे. अशा परिस्थितीमध्ये मणिपूरविषयी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे होते.’
हे ही वाचा >> ‘तुम्ही माझं ऐकत नाही’, शरद पवार-अजित पवार भेटीनंतर राज ठाकरेंचं मोठं भाकित
‘मात्र, पंतप्रधानांनी त्यांच्या सर्वात मोठ्या भाषणात अत्यंत छोटा उल्लेख करत याविषयीची भूमिका जी त्यांची आहे ती त्यांनी मांडली आहे. परंतु एकंदरीत राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली दिसत नाही. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात काहीही हाती लागलेले नाही.’
‘काँग्रेस मणिपूरच्या प्रश्नांमध्ये राजकारण करतात असा आरोप सत्ताधारी करतात. मात्र तीस वर्षापूर्वी काय झाले याच्यापेक्षा नऊ वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे जर काँग्रेसने काय केले नसेल तर तुम्हाला सत्ता दिली होती मग या नऊ वर्षात तुम्ही काय केले हे मात्र ते सोयीस्कर विसरत आहेत.’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT