NCP: अजित पवारांसह 40 आमदारांचं काय होणार, शरद पवारांनी ECI ला काय सांगितले?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sharad pawar , Ajit pawar The Election Commission considered the applications of both the claimant factions of NCP.
Sharad pawar , Ajit pawar The Election Commission considered the applications of both the claimant factions of NCP.
social share
google news

Sharad pawar ajit pawar ncp eci : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पण, शरद पवार अजूनही पक्षात फूट पडलेली नाही, असंच म्हणताहेत. शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या उत्तरात मोठी मागणी केली आहे. त्यामुळे अजित पवारांसह 40 आमदारांच्या सदस्यत्वाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

2 जुलै 2023 रोजी अजित पवार आणि इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षातील सर्वाधिक आमदार आपल्या बाजूने असल्याचे सांगत अजित पवारांनी शिवसेना-भाजप युती सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अर्जावर कार्यवाही सुरू केली आहे. दोन्ही गटांचे पक्ष ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळे दावे आहेत. दाव्यांची चौकशी करण्यासाठी आयोगाने दोघांनाही नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितले होते. अजित पवार गटाने जबाब नोंदवला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा >> अजित पवार गटाची ऑफर…रोहित पवारांनी का नकार दिला?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने नाव, चिन्ह आणि नियंत्रणाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करून पक्षात कोणतीही फूट नसल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, ECI ला शरद पवारांनी काय सांगितलं?

केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटलेलं आहे की, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार, आठ कॅबिनेट मंत्री आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या 31 आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांना घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार त्यांना अपात्र ठरवण्यात यावे’, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ADVERTISEMENT

अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष

ऑगस्टमध्ये आयोगाने शरद पवार गटाला 13 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी मुदत दिली होती. अजित पवार गटाने 30 जून रोजीच निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र दाखल करून पक्षाचे अध्यक्ष बदलल्याची माहिती आयोगाला दिली होती. राष्ट्रवादीने अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड केली असल्याचे अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सांगितले होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बारामतीत यु टर्न ते तेलगी प्रकरण, छगन भुजबळांचा शरद पवारांवर प्रश्नांचा भडीमार

यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यातच आता शरद पवार गटाने 500 पानी उत्तरात हाच दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग कुणाच्या बाजूने निकाल देणार, हे औत्सुक्याचे असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT