देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात पवारांनी काढल्या चुका, वाचा 2019 ची Inside Story
Devendra fadnavis sharad pawar and president rule in maharashtra : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा दावा २०१९ मधील सत्ता नाट्यावर बोलताना केला. शरद पवारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास सांगितले होते. त्यांच्या संमतीनेच तो निर्णय झाला, असं फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis on President Rule : २०१९ पासून महाराष्ट्राला पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. २०१९ मध्ये महाराष्ट्रात लावण्यात आलेल्या राष्ट्रपती मागचं राजकारण काय होतं, याचं उत्तर बुधवारी (४ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत शरद पवारांचा महत्त्वाचा रोल होता, हे सांगता फडणवीसांनी सगळा घटनाक्रमच सांगितला. (Devendra Fadnavis big revelation on President Rule in Maharashtra)
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या आशीर्वादाने २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी झाला होता का? या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी सगळा घटनाक्रम सांगितला.
‘शरद पवार असं म्हणतात की, भाजपसोबत जाण्यास तयार नव्हतो. मी जे केलं त्यामुळे भाजप-शिवसेनेत फूट पडली आणि विरोधकांना फायदा झाला. ही एक चाल होती, ज्यात भाजप अडकली.’ पवारांनी मांडलेल्या याच भूमिकेनंतर फडणवीस सगळं बोलून गेले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Devendra Fadnavis : ‘अजित पवारांना युतीत घेतलं, कारण…’, फडणवीसांनी दिलं उत्तर
या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, “बघा, ते नव्या नव्या गोष्टी सांगत असतात. एक दिवस त्यांनी सांगितलं की, राष्ट्रपती राजवट उठवायची होती म्हणून मी हे केलं. आता मी तुम्हाला त्याचं पूर्ण सत्य सांगतो. हे मी राखून ठेवलं होतं. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पनाच शरद पवारांची होती. शरद पवारांनी सांगितलं की, मी इतक्या लवकर भूमिकेवरून यू टर्न घेऊ शकत नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा.”
सरकार स्थापनेचं निमंत्रण, राष्ट्रवादीचे पत्र अन् फडणवीसांचं घर
फडणवीसांनी खरा गौप्यस्फोट पुढे बोलताना केला. ते म्हणाले की,” शरद पवार असं म्हणाले होते की, ‘राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन. नंतर मी भूमिका घेईन की, महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं यासाठी आम्ही भाजपसोबत जात आहोत.’ इतकंच नाही, तर त्यापुढचंही सांगतो”, असं म्हणत फडणवीसांनी त्या पत्राचा घटनाक्रम सांगितला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!
“राष्ट्रपती राजवट जेव्हा लागते, तेव्हा प्रत्येक पक्षाला पत्र देऊन विचारलं जातं की, तुम्ही सरकार बनवणार का? तसंच पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं गेलं. आणि आम्ही सरकार बनवणार नाही, हे जे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं ते मी टाईप केलं होतं. ते माझ्या घरी टाईप केलं होतं. त्यात शरद पवारांनी दुरुस्ती करायला सांगितली. ते बदल करून राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र दिलं गेलं. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती”, असं सांगत फडणवीसांनी त्या सगळ्या राजकीय प्रक्रियेत शरद पवारांचा महत्त्वाचा रोल होता हे अधोरेखित केलं.
“बघा शरद पवार मोठे व्यक्ती आहेत. अनेक गोष्टी बोलतात, पण सत्य हे आहे की, शिवसेनेने विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवारांनीच आमच्यासोबत चर्चा केली होती. आमच्यासोबत सरकार बनवू इच्छित होते”, असं फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT