शरद पवारांचे निर्णय प्रफुल पटेल बदलू शकतात का? आता पुढे काय होणार?

मुंबई तक

उद्धव ठाकरेंना कमकुवत केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले. आता अजित पवारांचे मनसुबेही असेच दिसत असून, त्यांना यश येणार का, हे पाहायचे आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra News marathi : राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्र वर्षभरानंतर पुन्हा देशात चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले आणि शिवसेनेत फूट पाडली. त्याचीच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना दिसत आहे. अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. इतकंच नाही, तर अजित पवार-प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नावासह पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांना कमकुवत करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या 18 आमदारांसह पक्षांतर करून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. पक्षाचे जवळपास 36 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा करत ते आहेत. ही संख्या राष्ट्रवादीच्या सध्याच्या संख्याबळाच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहे. राष्ट्रवादीचे सध्या 53 आमदार आहेत. (Who has the real NCP? Know who has what rights of action in Sharad Pawar and Ajit faction?)

दुसरीकडे पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याशिवाय अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख आणि मुंबई विभागाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

वाचा >> गौप्यस्फोट! एकनाथ शिंदे गुवाहाटीत असतानाच पवार-पटेलांचा झाला होता प्लॅन

अजित पवार यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाही विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. त्याचवेळी या कारवाईनंतर अजित पवारांच्या गटाने सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंना कमकुवत केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले. आता अजित पवारांचे मनसुबेही असेच दिसत असून, त्यांना यश येणार का, हे पाहायचे आहे. त्यामुळेच खरी राष्ट्रवादी कुणाची हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीविरोधात बंड करणाऱ्या नेत्यांना अजूनही निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? पक्षाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना काय अधिकार आहेत? हेच बघुयात.

हे वाचलं का?

    follow whatsapp