अजितदादा नाही तर सुप्रिया सुळेंमुळे शरद पवारांनी राजीनामा घेतला मागे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्यामुळे नाही तर सुप्रिया सुळेंमुळे मागे घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ADVERTISEMENT

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे का घेतला याबाबत आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना शरद पवार यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. ज्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा मागे का घेतला हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केलेल्या विधानमुळे आता अशी चर्चा रंगली आहे की, पवारांनी अजितदादांमुळे नाही तर सुप्रिया सुळेंमुळे त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे. आता ही चर्चा का रंगलीय हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (sharad pawar withdrew his resignation because of supriya sule not ajit pawar)
सुप्रिया सुळे सध्या मोठी जबाबदारी घेण्यास इच्छुक नाही!
तुम्ही राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार किंवा अध्यक्ष पद दिलं जावं अशी मागणी जोर धरत होती. असा प्रश्न शरद पवार यांना जेव्हा विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘सुप्रिया सुळे यांची इच्छा नाही. त्यांची इच्छा ही.. आता साधारणत: एका वर्षात लोकसभेची निवडणूक आलेली आहे. ती लोकसभेची निवडणूक होईपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलंय की, त्या कोणतीही जबाबदारी सध्या… मतदारांची जबाबदारी सोडली तर इतर जबाबदारी घेण्यास इच्छुक नाहीत.’ असं पवार म्हणाले.
…म्हणून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला?
शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असतानाच एका गोष्टीचा उल्लेख केला की, पक्षात काही बदल होणार आहेत. अध्यक्षपदासाठी नेत्यांनी आणि कार्यकर्ते आणि नेत्यांनीही नाव घेतलं होतं. पण सध्या तरी सुप्रिया सुळे या फक्त आपल्या मतदारसंघासाठी, मतदारांचीच जबाबदारी घेणार आहेत. त्यांची इतर कोणतीही मोठी जबाबदारी घेण्याची सध्या तरी तयारी नाही. असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा >> ‘राष्ट्रवादीला पॅक करून पाठवून द्या’, देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला
यावरुनच राजकीय जाणकार असं मत व्यक्त करत आहेत की, सुप्रिया सुळेंची अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयारी नसणं या मुद्द्याचा देखील शरद पवार यांनी विचार केला असणार त्यामुळे देखील त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा.










