Mla Disqualification : शिवसेनेप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निकाल येईल? राहुल नार्वेकरांनी मोठं विधान

ADVERTISEMENT

Shiv Sena decision criteria apply to NCP or not What exactly Rahul Narvekar
Shiv Sena decision criteria apply to NCP or not What exactly Rahul Narvekar
social share
google news

MLA Disqualification : गेल्या काही दिवसांपासून आमदार अपात्रतेच्या निकालावर राज्यासह देशात जोरदार चर्चा करण्यात येत होत्या. मात्र विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (ता. 10) निकाल देत कोणत्याही गटाच्या आमदारांना त्यांनी अपात्र ठरवले तर नाहीच तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Pratod Bharat Gogawale) यांची नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (CM Eknath Shinde) यांचाच पक्ष मुख्य शिवसेना असल्याचे सांगितल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी काय निर्णय देणार याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी टीव्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालावर बोलताना त्यांनी अनेक गोष्टींही यावेळी स्पष्ट केल्या आहेत.

 निकष बदलणार नाहीत

ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेवर विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुद्दे वेगळे आहेत, त्यामुळे तेही आधी तपासावे लागतील. हा निर्णय देतानाही निकष तपासूनच निर्णय द्यावा लागणार आहे. त्यामुळे काही निकष बदलणार नाहीत व कायदाही बदलणार नाहीत. प्रत्येक केसचे महत्व आणि विषय वेगळे असू शकतात. त्यामुळे त्या नियमानुसारच नियम लागू करावाल लागतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> सासूला सरप्राईज देणं पडलं महागात, सून थेट गेली तुरुंगात…

 प्रथा आणि परंपरा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदा, त्याची प्रथा आणि परंपरा असल्या तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो नियम व कायदा तो लागू होतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. कायदा लागू झाल्यानंतर तो निर्णय गाइडिंग फोर्स आणि बायडिंग फोर्स म्हणून काम करतात असं सांगत या प्रकारचा कायदा अंमलात आणला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 निर्णय काय लागणार?

शिवसेनच्या या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कारण हा निर्णय शिवसेनेसारखाच लागणार की काही वेगळा निर्णय लागणार याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे त्यावर त्यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादीविषयी निर्णय देताना आता त्या त्या वेळचे निकष तपासूनच तो निर्णय द्यावा लागले असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> ’10 वर्षापूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा पण आता…’, मोदींनी मुंबईत येताच केला प्रहार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT