शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरेंच्या वकिलाने मांडला गंभीर मुद्दा
ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आलेल्या सुनावणी वेळापत्रकावरच आक्षेप घेतला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणार, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
ADVERTISEMENT

Shiv Sena mlas disqualification Hearing : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात अखेर वेळापत्रक निश्चित करण्यात आले. पण, वेळापत्रकावरूनच ठाकरे गटाने गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी वेळापत्रकातील काही मुद्दे मांडले असून, या प्रकरणात लवकर निर्णय होण्याबद्दलच संशय व्यक्त केला आहे.
सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळापत्रक तयार केले आहे. विधिमंडळ सचिवालयाने वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, त्यानंतर यातील काही गोष्टींवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर बाजू मांडत असलेले वकील असीम सरोदे यांनी या बाबींचा उल्लेख केला आहे.
असीम सरोदे यांचं काय म्हटलंय…
असीम सरोदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. यातून त्यांनी काही मुद्दे अधोरेखित केले आहेत.
ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे म्हणतात…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने शेवटी अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले.